भाविकांच्या रेट्यापुढे नमले विश्वस्त ; माेफत टाेकनद्वारे घेता येणार कालिकेचे दर्शन

नाशिककरांची श्री कालिका देवी ग्रामदैवत असल्याने नवरात्रौत्सवाच्या काळात देवी दर्शनासाठी दिवसाकाठी लाखो भाविकांची गर्दी होत. त्यामुळे नवरात्रौत्सवाच्या काळात २४ तास मंदिर उघडे रहाणार असून, भाविकांची गर्दी टाळण्यासाठी फेसबुकद्वारे ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली आहे.

  नाशिक : भाविकांच्या नारााजीनंतर ग्रामदैवत कािलकेच्या दर्शनासाठी शंभर रुपयांचे पास ठेवण्याचा निर्णय विश्वस्तांनी मागे घेतला अाहे. भाविकांना सुलभ देवीदर्शन होण्यासाठी मंदिर प्रशासनाने ऑनलाइन टोकन दर्शनाची साेय करण्यात आली असून, टाेकन असल्याशिवाय दर्शन घेता येणार नसल्याची माहिती  विश्वस्त केशव आण्णा पाटील यांनी दिली.
  पाेलिसांकडून नियमावली
  अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकची ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिरात युद्ध पातळीवर तयारी सुरु आहे. शासनाने मंदिर उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र स्थानिक पोलीसांनी गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात  कलम १४४ अन्वये लावण्याचे निश्चित केल्यामुळे कालिका मंदिरात भाविकांना दर्शन  मिळत नसल्यामुळे देवी भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.
  येथे मिळेल टाेकन
  नाशिककरांची श्री कालिका देवी ग्रामदैवत असल्याने नवरात्रौत्सवाच्या काळात देवी दर्शनासाठी दिवसाकाठी लाखो भाविकांची गर्दी होत. त्यामुळे नवरात्रौत्सवाच्या काळात २४ तास मंदिर उघडे रहाणार असून, भाविकांची गर्दी टाळण्यासाठी फेसबुकद्वारे ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली आहे. विनामूल्य ऑनलाइन टोकन दर्शनाची सोय करण्यात आली आहे. ऑनलाईन टोकन  दर्शनासाठी भाविकांची मंदिराच्या अधिकृत असलेल्या www.kalikamandirtrust.org या संकेतस्थळावर जाऊन बुकिंग करण्याचे आवाहन अध्यक्ष पाटील यांनी केले.
  गर्दी न करण्याचे आवाहन
  जिल्हा आणि पोलिस प्रशासनाच्या नियमावली व आदेशानुसार १० वर्षांच्या आतील आणि ६५ वर्षांच्या पुढील भाविकांना दर्शन मिळणार नाही. ज्या भाविकांनी ऑनलाइन दर्शनाची बुकींग केली असेल अशाच भाविकांना दर्शन मिळणार आहे. मात्र भाविकांनी दर्शनासाठी येतांना कोणत्याही प्रकारचे हार, फुले, नारळ, हळदी, कुंकू, ओटीचे साहित्य सोबत आणू नये तसेच ऑनलाइन दर्शनाचे टोकन नसणा-या इतर भाविकांनी मंदिरासह परिसरात गर्दी करु नये, असे मंदिर प्रशासनाच्यावतीने जाहिर करण्यात आले आहे.