अज्ञात माथेफिरूने युरिया टाकला ; ६००क्विंटल कांद्याचे नुकसान

नांदगावपासून जवळ असलेल्या मांडवडच्या आझाद नगर येथील शेतकरी भगवान पाटील यांनी त्याच्या शेतात कांद्याची लागवड केली होती. मात्र कांद्याला मातीमोल भाव मिळत होता. त्यात भावात पिकावर केलेले खर्च ही निघत नसल्याचे पाहून पुढे भाव वाढतील या आशेवर त्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला होता. आता कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचे पाहून त्यांच्या अशा पल्लवित झाल्या होत्या.

    नांदगाव : मांडवडच परिसरातील आझाद नगर येथे अज्ञात माथेफिरुने चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यात युरिया टाकल्यामुळे पंधरा दिवसात तब्बल ६०० क्विंटल कांदा खराब झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून युरिया टाकणाऱ्याचा शोध घेत आहे

    नांदगावपासून जवळ असलेल्या मांडवडच्या आझाद नगर येथील शेतकरी भगवान पाटील यांनी त्याच्या शेतात कांद्याची लागवड केली होती. मात्र कांद्याला मातीमोल भाव मिळत होता. त्यात भावात पिकावर केलेले खर्च ही निघत नसल्याचे पाहून पुढे भाव वाढतील या आशेवर त्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला होता. आता कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचे पाहून त्यांच्या अशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र अज्ञात माथेफिरुणे पंधरा दिवसांपूर्वी चाळीत युरिया टाकला त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पाटील व त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला त्यांनी पोलीस स्थानकात जावून या बाबत तक्रार दिली. आणि त्यानंतर चाळीत खराब झालेला कांदा बाजूला करून वाचलेला कांदा काढून दुसऱ्या चाळीत ठेवला; मात्र या माथेफिरूने पुन्हा या चाळीत देखील युरिया टाकला त्यामुळे सर्व ६००क्विंटल कांदा खरा होऊन पाटील यांचे सुमारे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून नांदगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून युरिया टाकणाऱ्याचा शोध घेत आहे

    पंधरा दिवसांपूर्वी कांदा चाळीत युरिया टाकल्यानंतर मी पोलीस स्थानकात तक्रार दिली होती; मात्र पोलिसांनी त्यावेळी माझ्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही. जर वेळीच दखल घेवून आरोपींला पकडले असते तर दुसऱ्यांदा असा प्रकार घडला नसता. आता पोलिसांनी आरोपीला पकडून त्याच्यावर कडक कारवाई तर करावीच शिवाय त्याच्याकडून झालेल्या नुकसानाची भरपाई मला मिळवून द्यावी.

    - भगवान पाटील, पीडित शेतकरी