पेट्रोल- डिझेल वाहतूक करणाऱ्या ट्रँकरमधूनच पेट्रोल- डिझेलची चोरी

मनमाड : येथील इंडियन ऑइल कंपनीच्या टॅंकरमधून पेट्राेल-िडझेलची सर्रास चाेरी हाेत असल्याचा प्रकार डीलरच्या सतर्कतेमुळे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. चोरी करण्यासाठी लॉक सिस्टीममध्ये फेरफार करण्यात आल्याचेही उघड झाल्याचे वृत्त आहे.
पेट्रोल-डिझेलची चाेरी राेखण्यासाठी कंपनीने वेळाेवेळी वेगवेगळ्या उपाययोजना करूनदेखील हा प्रकार थांबत नसल्याने अाश्चर्य व्यक्त हाेत अाहे. साेमवारी इंडियन ऑयल कंपनीच्या टँकरमधून पेट्रोल-डीझेलची चोरी करण्यासाठी लॉक सिस्टीममध्ये फेरफार करण्यात आल्याचा गंभीर प्रकार डीलरच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला अाला. टँकरच्या लॉक सिस्टीममध्ये फेरफार केल्याप्रकरणी  2 टँकर काळ्या यादीत टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विशेष म्हणजे हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी डीलरला कंपनीच्या विशेष पथकाची मदत घ्यावी लागली. त्यामुळे स्थानिक अधिकारी करता तरी काय? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंडियन ऑयल कंपनीच्या एका डीलरच्या पंपावर पेट्रोल-िडझेलचा पुरवठा करणाऱ्या टँकरमधून इंधन साठा कमी येत असल्याचे आढळून आल्यानंतर या डीलरने कंपनीत तक्रार तर केलीच शिवाय स्वत:ही पाळत ठेवली असता त्याच्या लक्षात आले की, टँकरमधून पेट्रोल-िडझेल चोरी करण्यासाठी वॉल सिस्टमची पेटी आणि टँकरवर असलेले घमेले यांच्यात नट-बोल्ट लावण्यात आल्याचे आढळून आले. नट-बोल्ट काढल्यानंतर टँकरमधून इंधन चोरी करणे सहज शक्य होत असल्याचेही निष्पन्न झाले.

या िडलरने टँकरमधून केली जाणारी पेट्राेल-िडझेलची चोरी पकडल्यानंतर त्याची रीतसर कंपनीच्या स्थानिक प्रकल्पातील अधिकाऱ्याकडे तक्रार केली. शिवाय मुंबई येथे ही तक्रार केली होती. िडलरच्या तक्रारीची दखल घेत मुंबईच्या विशेष पथकाने पानेवाडी प्रकल्पात येऊन ज्या टँकरमध्ये फेरफार करण्यात आले होते; त्यांचा पर्दाफाश केला.

मनमाड पासून ४ ते ७ किमी अंतरावर नागापूर-पानेवाडी परिसरात इंडियन ऑयल,भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे इंधन प्रकल्प असून या तिन्ही प्रकल्पातून रोज सुमारे सुमारे दीड हजार टँकरच्या माध्यमातून राज्यभरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल-डीझेलचा पुरवठा केला जातो सुमारे 8 वर्षांपूर्वी इंधनाच्या अवैध अड्ड्यावर छापा मारण्यासाठी गेलेले मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना इंधन माफियांनी जिवंत जाळून ठार मारल्याची घटना घडल्यानंतर इंधन चोरीला आळा बसविण्यासाठी तिन्ही कंपन्यानी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत मात्र तरी देखील कधी बनावट चाबीचा वापर करून तर कधी टँकरच्या लॉक सिस्टीम मध्ये फेरफार करून इंधन चोरी सुरूच आहे.