टाेल नाक्यावर अग्निशमन यंत्रणाच नाही ; खाेके भरलेला ट्रक खाक

सहा महिन्यापूर्वी याच ठिकाणी साकोरे मिग येथील प्रगतिशील शेतकरी संजय शिंदे यांची कार पेटली होती. मदत न मिळाल्याने यात संजय शिंदे यांचा दुर्दैवी अंत झाला. एकाच ठिकाणी दोन वेळा वाहन पेटण्याचे प्रकार घडत असताना टोल प्रशासनाकडे आग विझविण्याची कोणतीही यंत्रणा नसल्याबद्दल वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत अाहे.

  पिंपळगाव बसवंत : कागदी खाेके भरलेल्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने पिंपळगाव बसवंत टाेल नाक्यावर एकच धावपळ उडाली. सुदैवाने यात काेणतीही जीिवतहानी झाली नाही. टाेल नाक्यावर अिग्नशमन यंत्रणा असणे बंधनकारक असताना या टाेेल नाक्यावर मात्र काेणत्याही प्रकारची यंत्रणा अस्तित्वात नसल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे. सहा महिन्यांपूर्वीदेखील याच ठिकाणी शेतकऱ्याच्या कारने पेट घेतला हाेता. त्यात या शेतकऱ्याचा हाेरपळून मृत्यू झाला हाेता. तरीदेखील या टाेेलनाक्यावर अिग्नशमन यंत्रणा बसविण्यात आली नसल्याने ग्रामस्थांसह वाहनचालकांत संताप व्यक्त हाेत आहे.

  नादुरूस्त ट्रक पेटला

  पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यालगत मुंबई-आग्रा महामार्गावर साकोरे फाट्याजवळ गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कागदी खोके भरलेला ट्रक अचानक पेटला. या आगीत ट्रकमध्ये असलेल्या खोक्यांची राख झाली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत सविस्तर वृत्त असे की गुरुवारी दुपारी (एमएच ०५-१६११) हा मालट्रक मालेगावकडून नाशिककडे कागदी खोके घेऊन जात होता. पिंपळगाव टोल नाका ओलांडल्यानंतर साकोरे फाट्याजवळ हा मालट्रक नादुरुस्त झाला लाॅकडाऊनमुळे गॅरेज बंद आणि मेकॅनिक मिळाला नसल्याेने वाहनचालक महामार्गावरच मालट्रक उभा करून मालेगावला रवाना झाला. मात्र तो रात्री अकरा वाजेपर्यंत परतला नाही.

  सकाळपर्यंत धुमसत हाेती आग

  दरम्यान, रात्री अकरा वाजेच्या सुमारास मालट्रकला अचानक आग लागली. स्थानिक नागरिकांनी तातडीने पिंपळगाव पोलिस, अग्निशामक दल यांना माहिती दिली. पिंपळगाव अग्निशामक दल, ओझर अग्निशामक दलाने तात्काळ आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले; तरीही सकाळपर्यंत खोक्यातून आग धुमसत होती.

  सहा महिन्यांपूर्वी शेतकऱ्याचा मृत्यू

  सहा महिन्यापूर्वी याच ठिकाणी साकोरे मिग येथील प्रगतिशील शेतकरी संजय शिंदे यांची कार पेटली होती. मदत न मिळाल्याने यात संजय शिंदे यांचा दुर्दैवी अंत झाला. एकाच ठिकाणी दोन वेळा वाहन पेटण्याचे प्रकार घडत असताना टोल प्रशासनाकडे आग विझविण्याची कोणतीही यंत्रणा नसल्याबद्दल वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत अाहे. महामार्गावर वाहन पेटण्याच्या घटना लक्षात घेऊन टोल प्रशासनाने तातडीने अग्निशामक वाहन सज्ज करावे, अशी मागणी होत आहे. पोलीस मालट्रक मालक व चालक यांचा शोध घेत आहे

  गेल्या सहा महिन्यांतील वाहन पेटण्याची ही दुसरी घटना आहे. हाकेच्या अंतरावर टोलनाका असतानाही टोल प्रशासनाने काहीही हालचाल केली नाही. त्यांच्याकडेआग विझविण्याची कोणतीही यंत्रणा नाही त्यामुळे वाहनधारकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. टोल प्रशासनाने तातडीने अग्निशामक वाहन सज्ज न केल्यास कोणत्याही क्षणी महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले जाईल.

  - सोमनाथ बोराडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना