निफाड तालुक्यात अग्निशमन यंत्रणाच नाही! ; नऊ दुकाने जळून खाक

निफाड रोडलगत असलेल्या शॉपिंग सेंटरला काल रात्री अचानक आग लागली. सर्वप्रथम गॅरेजला आग लागली. गॅरेजमध्ये असेलेल्या ऑईलच्या डब्यांमुळे आग भडकली आणि सुमारे ९ दुकाने या आगीत जळून खाक झाली आहेत. निफाड तालुक्यात एकही अग्निशमन दलाचा बंब नसल्याने नाशिकहून अग्निशमन दलाचा बंब मागविण्यात आला. परंतु बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत सुमारे दोन तासांचा कालावधी उलटला. यामुळे बंब येईपर्यंत सुमारे ९ दुकानांचे नुकसान झाले आहे. या आगीत १ कोटी २९ लाख ४१ हजार ५१० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कामगार तलाठी खडांगळे यांनी दिली.

    निफाड : निफाड रोडलगत असलेल्या शॉपिंग सेंटरला लागलेल्या आगीत आज मध्यरात्री आग लागली. या आगीत ९ दुकाने जळून खाक झाली आहेत. दुकानांना लागलेल्या आगीमुळे सुमारे १ कोटी ३० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जळून खाक आहे.

    दरम्यान, अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच धावपळ उडाली. आग लागली त्या ठिकाणापासून पेट्राेलपंप काही अंतरावर असल्याने ही आग पसरली तर माेठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले हाेते. परंतु सुदैवाने ही आग लवकर आटाेक्यात आल्यामुळे पुढची दुर्घटना टळली. तालुक्यात एकही अग्निशमन बंब नसल्याने एवढ्या माेठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आराेप परिसरातील नागरिक तसेच व्यावसाियकांनी केला आहे.

    अधिक माहिती अशी की, निफाड रोडलगत असलेल्या शॉपिंग सेंटरला काल रात्री अचानक आग लागली. सर्वप्रथम गॅरेजला आग लागली. गॅरेजमध्ये असेलेल्या ऑईलच्या डब्यांमुळे आग भडकली आणि सुमारे ९ दुकाने या आगीत जळून खाक झाली आहेत. निफाड तालुक्यात एकही अग्निशमन दलाचा बंब नसल्याने नाशिकहून अग्निशमन दलाचा बंब मागविण्यात आला. परंतु बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत सुमारे दोन तासांचा कालावधी उलटला.
    यामुळे बंब येईपर्यंत सुमारे ९ दुकानांचे नुकसान झाले आहे. या आगीत १ कोटी २९ लाख ४१ हजार ५१० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कामगार तलाठी खडांगळे यांनी दिली.

    रात्रीच्यावेळी लागलेल्या आगीत जवळपास ८ ते ९ दुकाने जळून खाक झाली आहेत. यात साधारण सव्वा काेटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. प्रवीण गायकवाड यांचे सानिज मेन्स पार्लर या दुकानाचे जवळपास सहा लाखांचे फर्निचर जळून खाक झाले. मेहक किड्‌स वेअर या दुकानाचे साधारणत: वीस लाख रूपयांपेक्षा जास्त ड्रेस जळून खाक झाले. त्यामुळे आता यापुढे उदरनिर्वाह करायचा कसा? असा प्रश्न शेख कुटुंबीयांपुढे उभा ठाकला आहे. याबराेबरच राजेंद्र खैरे यांच्या मालकीच्या ईश्वर अॅटाे सेंटर, समृद्धी ट्रेडर्स, वसुंधरा हार्डवेअर या दुकानांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.