no water supply in mumbai some areas as on 2nd and 3rd December says mcgm

उद्या शुक्रवारी (दि.१९) सकाळचा, दुपारचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा काही भागात होऊ शकणार नाही. तसेच २० मार्च रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, असे महानगरपालिकेच्यावतीने कळविण्यात आले आहे. नागरीकांनी मनपास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

    नाशिक : गांधी नगर जलशुध्दीकरण केंद्रास पुरवठा करणारी मुख्य पीएससी (सिंमेट) १२०० मी.मी.चा रॉ-वॉटर पाईप लाईन नादुरुस्त झाल्याने हे काम तातडीने करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या शुक्रवारी (दि.१९) नाशिक मधील काही भागात सकाळचा, दुपारचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

    गोविंद नगर जॉगिंग ट्रॅक, मनोहर नगर समोरील गांधीनगरकडे जाणारी पाईपलाईन नादुरुस्त झाल्याने हे काम तातडीने हाती घ्यावयाचे आहे. कालिका जलकुंभ येथील गुरुत्ववाहिनीची गळती थांबविण्यासाठी आवश्यक ते काम करावे लागणार असल्याने तातडीने कामे करावी लागणार आहे. त्यामुळे उद्या शुक्रवारी (दि.१९) सकाळचा, दुपारचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा काही भागात होऊ शकणार नाही. तसेच २० मार्च रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, असे महानगरपालिकेच्यावतीने कळविण्यात आले आहे. नागरीकांनी मनपास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

    याभागात पाणीपुरवठा राहणार बंद
    नाशिक पूर्व- प्रभाग क्र. १४ भागश:, १५ भागश:,२३ भागश:, ३० भागश: प्र.क्र. १६ पूर्ण नाशिक पश्चिम- प्रभाग क्र.७,१२ व १३ मधील संपुर्ण भाग पंचवटी विभाग- प्रभाग क्र. १,२,३,४,५ व ६ मधील संपूर्ण भाग नाशिक रोड विभाग- प्रभाग क्र. १७,१८,१९,२०,२१ व २२ नविन नाशिक विभाग- प्रभाग क्र.२५ भागश:, २६ भागश: व २८ भागश: सातपुर विभाग- प्रभाग क्र. ०८,९,१०,११,२६ पूर्ण २७ चुंचाळे व दत्त नगर परिसर