चर्चा तर होणारच! या नवरदेवाने शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी स्वतःच्या वाहनावर केली ‘शेतकरी’ नावाची सजावट

नवरदेवाच्या गाडी म्हंटली की दुल्हन हम ले जाऐंगे, शेवटी मामाचीच केली असे अनेक नाव आपल्याला पहावयास मिळतात. मात्र कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी नवरेदेवाची गाडी सजवलेली आपण बहुदा पाहिली नसेल. खामखेडा येथील प्रगतिशील शेतकरी कडु सखाराम आहेर यांचे नातू व अरुण आहेर यांचे चिरंजीव कृषी पदवीधर पवन याचे वनोली तालुका बागलाण येथील कै. राजेंद्र बाळू भामरे यांची कन्या पल्लवी यांचा नुकताच विवाह सोहळा संपन्न झाला.

    देवळा : अनेक विवाह सोहळे वेगवेगळ्या कारणाने नेहमी चर्चेचा विषय ठरत असतात. समाजात आपली मान नेहमी उंच रहावी यासाठी अनेक ठिकाणी आकर्षक सजावट, हेलिकॉप्टर ने लग्नमंडपात आगमन असे अनेक किस्से आपण ऐकले असतील पाहिले असतील. मात्र खामखेडा ता. देवळा येथील वराने स्वतःच्या नव्हे तर सर्व शेतकरी बांधवांच्या सन्मानासाठी सजवलेली गाडी सद्या खूपच चर्चेचा विषय ठरत आहे.

    नवरदेवाच्या गाडी म्हंटली की दुल्हन हम ले जाऐंगे, शेवटी मामाचीच केली असे अनेक नाव आपल्याला पहावयास मिळतात. मात्र कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी नवरेदेवाची गाडी सजवलेली आपण बहुदा पाहिली नसेल. खामखेडा येथील प्रगतिशील शेतकरी कडु सखाराम आहेर यांचे नातू व अरुण आहेर यांचे चिरंजीव कृषी पदवीधर पवन याचे वनोली तालुका बागलाण येथील कै. राजेंद्र बाळू भामरे यांची कन्या पल्लवी यांचा नुकताच विवाह सोहळा संपन्न झाला. नवरदेव ज्या वाहनावर विवाहस्थळी जाणार होता त्या वरासाठी सजावट केलेल्या गाडीवर शेतकरी व वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटा पुतळा ठेवत अफलातून सजावट करण्यात आल्याने ही आकर्षक सजावट सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल माध्यमातून या सजावटीचा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून नवरदेवाचे भरभरून कौतुक होत आहे.

    आपल्या कृषिप्रधान देशात वावर आहे तर पावर आहे हे आपण सर्वत्र ऐकत असतो; मात्र याची वाहवाही कोणी करतांना कुणी दिसत नाही. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी मी गाडीवर ‘शेतकरी’ असे दिमाखात नाव लावल्याचे नवरदेव पवन आहेर यांनी सांगितले.