इगतपुरीत कडकडीत बंद : महािवकासचा माेर्चा; रास्ताराेकाे

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांंनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर इगतपुरी रेल्वे स्टेशनसमोर रास्तारोको करण्यात आल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या बंदच्या आवाहनाला व्यापाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद दिसून आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इगतपुरी शहराच्या मुख्य बाजारपेठेत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

  इगतपुरी : उत्तर प्रदेश मधील लखीमपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष या महाविकास आघाडीच्या वतीने इगतपुरी, घोटी शहरातील मुख्य बाजारपेठ व महामार्गावरील दुकाने बंद करण्यासाठी आवाहन करण्यात आले.

  महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांंनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर इगतपुरी रेल्वे स्टेशनसमोर रास्तारोको करण्यात आल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या बंदच्या आवाहनाला व्यापाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद दिसून आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इगतपुरी शहराच्या मुख्य बाजारपेठेत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

  सरकारविराेधात घाेषणा
  घोटी येथे आमदार हिरामण खोसकर यांच्या आदेशाने काँग्रेसचे पदाधिकारी मोर्चात सामील झाले. यावेळी महाविकास पदाधिकारी यांनी मोर्चा काढून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.

  यांची उपसि्थती
  या बंदमध्ये शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार निर्मला गावित, काशिनाथ मेंगाळ, ज्येष्ठ नेते रघुनाथ तोकडे, तालुका प्रमुख भगवान आडोळे, माजी तालुका उपप्रमुख कुलदीप चौधरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, शेतकरी नेते पांडुरंग शिंदे, निवृत्ती कातोरे, अरुण भोर, माजी पंचायत समिती उपसभापती पांडुरंग वारूंगसे, विष्णू चव्हाण, नंदलाल भागडे, अरूण गायकर, घोटी ग्रामपंचायतचे माजी सरपंच रामदास भोर, संजय आरोटे, सदस्य श्रीकांत काळे, डायमंड कडू, विक्रम मुनोत, समता परिषदेचे शिवा काळे, निलेश कडु, मदन कडू, ज्ञानेश्वर कडू, वैभव कोरडे, संदीप डावखर, एकनाथ कडवे, रामदास कडवे यांच्यासह शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे व राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.