राज्याभिषेक सोहळ्यासाठी मिळेल त्या वाहनाने रायगडाकडे कूच करा; संभाजीराजे छत्रपतींचा आदेश

संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे कूच करा, असा आदेश दिला आहे. सोमवारी मराठा क्रांती मोर्चाच्या ऑनलाईन बैठकीत त्यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता 6 जून रोजी किल्ले रायगडावरून संभाजीराजे कोणती नवी घोषणा करणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

    नाशिक : खासदार संभाजीराजे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा आता आणखीचं पेटत चालला आहे. संभाजीराजे यांनी ठाकरे सरकारसमोर पाच प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या, त्यासोबतच ठाकरे सरकारला 6 जून पर्यंत अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर ठाकरे सरकारची मोठी पंचायत झाली होती. मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका अद्याप सरकारनं घेतली नसल्यानं आता संभाजीराजे यांनी मोठं पाऊल उचललं आहे.

    शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे कूच करा

    दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे कूच करा, असा आदेश दिला आहे. सोमवारी मराठा क्रांती मोर्चाच्या ऑनलाईन बैठकीत त्यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता 6 जून रोजी किल्ले रायगडावरून संभाजीराजे कोणती नवी घोषणा करणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

    तसेचं 2 जून रोजी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत त्यांनी पुढील कार्यक्रमाच्या सुचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्याआधी संभाजीराजे यांनी महाराष्ट्र दौरा केला आहे. या त्यांनी विविध जिल्ह्यातील नेत्यांशी मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा केली आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात सध्या कोरोनामुळे जिल्ह्याबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आता रायगड जिल्ह्यात प्रवेश नसल्यानं संभाजीराजे आणि प्रशासन आमने-सामने येण्याची शक्यता आहे. आता यावर सरती भूमिका कोण घेणार यावर सर्वांचं लक्ष आहे.