त्र्यंबक नाका बॅंक ऑफ इंडियाची शाखा तीन दिवस बंद ; बँकेतील कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने घेतला निर्णय

त्र्यंबक नाका परिसरातील बॅंक ऑफ इंडियात काेराेेनाबाधित रुग्ण आ ढळल्याने बॅंक तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बॅंकेत काेराेनाबाधित रुग्ण आढळल्याने येथे येऊन गेलेल्या तसेच सकाळी सकाळी बॅंकेत दाखल झालेल्या अभ्यागत तसेच कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली.

    नाशिक : त्र्यंबक नाका परिसरातील बॅंक ऑफ इंडियात काेराेेनाबाधित रुग्ण आ ढळल्याने बॅंक तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बॅंकेत काेराेनाबाधित रुग्ण आढळल्याने येथे येऊन गेलेल्या तसेच सकाळी सकाळी बॅंकेत दाखल झालेल्या अभ्यागत तसेच कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली.

    सध्या शहरात काेराेेनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे नागरिकांत आधीच घबराट पसरली असताना त्र्यंबक नाका परिसरातील बॅंक ऑफ इंडियातील कर्मचारी हे काेराेना पाॅझीिटव्ह आल्याचा अहवाल आल्यानंतर सर्वांचीच धावपळ उडाली. त्यानंतर बॅंकेने सॅनिटायझेशनचे काम सुरू केले असून, ही शाखा आता तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र गेल्या काही दिवसांत शाखेत कामानिमित्त आलेल्यांचा शाेध घेण्याचे आव्हान प्रशासनासमाेर असणार आहे.