murder by firing

मालेगावमधील(malegav) जुना आग्रा रोडवरील न्यू ताज हॉटेलवर चहा पीत बसलेल्या ४ ते ५ जणांवर दुचाकीवर आलेल्या १४ ते १५ जणांच्या टोळीने अचानक हल्ला करीत गोळीबार केला.(firing at malegav) या हल्ल्यात दोन जण गंभीर(two injured in malegav) जखमी झाले आहेत.

मालेगाव : मालेगावमधील(malegav) जुना आग्रा रोडवरील न्यू ताज हॉटेलवर चहा पीत बसलेल्या ४ ते ५ जणांवर दुचाकीवर आलेल्या १४ ते १५ जणांच्या टोळीने अचानक हल्ला करीत गोळीबार केला.(firing at malegav) या हल्ल्यात दोन जण गंभीर(two injured in malegav) जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते.

शहरातील जुना आग्रा रोडवरील न्यू ताज हॉटेलवर आज दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास इब्राहिम खान, इस्माईल खान  चार ते पाच जणांसोबत चहा पित असताना त्या ठिकाणी सईद गांजावाला, मसूद गांजावाला, जाहिद गांजावाला, फिरोज गांजावाला, मोईन काल्या व अन्य असे १४ ते १५ जणांच्या टोळीने इब्राहिम खान व त्याच्या साथीदारांवर हल्ला केला. हल्लेखोरांकडे हातात पिस्तूल, तलवारी, लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉड अशी हत्यारे होती. यावेळी आपला जीव वाचवत पळत असणाऱ्या इब्राहिम खान याचेवर हल्लेखोरांनी मागून गोळीबार केला. यावेळी हल्लेखोरांनी १२ ते १३ राऊंड फायर केले. यात इब्राहिम याच्या उजव्या पायाच्या मागे गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. तर त्याचा मेव्हणा अबरार शेख (२४) रा. आयेशा नगर हा देखील या हल्ल्यात जखमी झाला असून दोघांना उपचारासाठी येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यातील जखमी इब्राहिम व हल्लेखोर गांजावाला यांच्यातील पूर्वीच्या वादातून सदर हल्ला झाला असल्याचे खुद्द जखमी इब्राहीम याने पत्रकारांशी बोलताना सांगितले. हल्लेखोरांचा गांजाचा व्यवसाय असून त्याच्याविरोधात पोलिसांना माहिती दिल्याने गांजावाला यांचेवर चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर जखमी इब्राहिम हा देखील सराईत गुन्हेगार असून या दोघांमध्ये पूर्वी पासून वाद होते. या वादातूनच हा हल्ला झाल्याचे समजते.