दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू, नाशिक परिसरात शोककळा

शाळांना सुटी असल्याने सोमवारी सकाळी जुन्या नाशकातील सहा ते सात मुलांचा ग्रुप दुचाकींवरून भटकंतीकरिता बाहेर पडला. सावरगावमार्गे हे सगळे मित्र गंगापूर धरणावर पोहचले. संध्याकाळी सुर्यास्त बघून घरी परतण्याचा बेत आखलेला असताना फोटोसेशन करताना कैफ उमर शेख (१६), साबीर सलीम बेग दोघे रा.खडकाली, त्र्यंबक पोलीस चौकीमागे) हे अचानकपणे जलाशयात कोसळले.

    नाशिक : गंगापूर धरण परिसरामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या मित्रांच्या ग्रुपमधील दोन अल्पवयीन मुलांचा सोमवारी संध्याकाळी जलाशयात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.  दोन दिवसांपूर्वीच जुन्या नाशिक मधील वडाला नाका भागात सिलेंडर अपघातात ४ जणांना जीव गमवावे लागले होते. आता खडकाळी परिसरात झालेल्या या दोन्ही दुर्घटनेमुळे संपूर्ण जुने नाशिक परिसरात शोककळा पसरली आहे.

    शाळांना सुटी असल्याने सोमवारी सकाळी जुन्या नाशकातील सहा ते सात मुलांचा ग्रुप दुचाकींवरून भटकंतीकरिता बाहेर पडला. सावरगावमार्गे हे सगळे मित्र गंगापूर धरणावर पोहचले. संध्याकाळी सुर्यास्त बघून घरी परतण्याचा बेत आखलेला असताना फोटोसेशन करताना कैफ उमर शेख (१६), साबीर सलीम बेग दोघे रा.खडकाली, त्र्यंबक पोलीस चौकीमागे) हे अचानकपणे जलाशयात कोसळले.

    एकमेकांना वाचविण्यासाठी दोघांनी प्रयत्न केला. मात्र पोहता येत नसल्याने पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. यावेळी त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्यासोबत आलेले अन्य मित्रदेखील धावले. मात्र तोपर्यंत दोघेही पाण्यात बुडालेले होते. मित्रांनी आजूबाजूला धाव घेत स्थानिक युवक आणि नागरिकांना सांगून मदतीला बोलावले. काही स्थानिक जलतरणपटूंनी पाण्यात सूर लगावत दोघांना बाहेर काढण्यासाठी शोध सुरु केला.

    सुमारे अर्ध्या तासानंतर कैफ आणि साबीर यांचे मृतदेह हाती आले. त्यांच्या मृत्युने जुने नाशिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जलाशयातँ बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच जुन्या नाशिक मधील वडाला नका भागात सिलेंडर अपघातात ४ जणांना जीव गमवावे लागले होते. आता खडकाळी परिसरात झालेल्या या दोन्ही दुर्घटनेमुळे संपूर्ण जुने नाशिक परिसरात शोककळा पसरली आहे.