धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या २ युवकांचा मृत्यू

तालुक्यातील ५ महाविद्यालयीन या धबधब्यावर पोहण्यासाठी आले होते. धबधब्यावर ग्रुप फोटो काढून पाण्यात पोहण्यासाठी उतरत होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम गुजर व ऋषीकेश तोटे हे पाण्यातील भवऱ्यात अडकून खाली बुडाले. तसेच एकाने दगडाला पकडल्याने तो बचावला आहे.

नाशिक : नाशिक (Nashik) मधील देवळा तालुक्यात दहिवड परिसरात धबधब्यावर (waterfall) पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू  (died) झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने या दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नाशिकमधील देवळा तालुक्यात चांगला पाऊस पडल्यामुळे डोंगर भागात असलेला चोरचावडी धबधबा नागरिकांना आणि पर्यटकांना आकर्षित करत आहे. हा भाग सतात दुष्काळग्रस्त असतो. यंदा चांगला पाऊस झाल्याने येथील निसर्गाचे दृष्य खुलले आहे. धबधबा पाहण्यासाठी आणि पोहण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण येत असतात.

तालुक्यातील ५ महाविद्यालयीन या धबधब्यावर पोहण्यासाठी आले होते. धबधब्यावर ग्रुप फोटो काढून पाण्यात पोहण्यासाठी उतरत होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम गुजर व ऋषीकेश तोटे हे पाण्यातील भवऱ्यात अडकून खाली बुडाले. तसेच एकाने दगडाला पकडल्याने तो बचावला आहे.

दोन तरुण दिसत नसल्याने त्यांनी हाक मारण्यास सुरुवात केली. तसेच उपस्थित युवकांनी त्या दोघांना शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा दोन्ही तरुण सापडले तोपर्यंत वेळ निघून गेला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच दोघांचा मृतदेह शवविच्छेदनास पाठविण्यात आला. पोलिस पुढिल तपास करत आहेत.