टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार  : काेराेनाबाधितांच्या भाेजन देयकात गडबड : पाटील

काेराेना काळात डाॅ. झाकीर हुसेन रुग्णालय तसेच बिटको रुग्णालयात दाखल असलेल्या बहुतेक रुग्णांना घरचा जेवणाचा डबा येत हाेता. त्यामुळे येथे किती रुग्णांना जेवण, चहा, नाष्टा दिला गेला, याची कुठलीही नाेंद या बिलात नाही. रुग्णांना घरचाच डबा येत हाेता तर मग एवढे बिल झालेच कसे? असा सवालही पाटील यांनी उपसि्थत केला आहे.

  नाशिक : काेेराेनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर रुग्णांच्या साेयीसाठी महापालिकेने उभारलेल्या कोविड सेंटरबरोबरच बिटको व डाॅ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या जेवणाच्या नावाखाली जवळपास पाऊण काेटी रुपयांचे बिल काढण्याच्या प्रकाराला भाजपाचे गटनेते जगदीश पाटील यांनी हरकत घेऊन या बिलांचे प्रस्ताव नामंजूर करण्याची मागणी आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे.

  घरचाच डबा
  काेराेना काळात डाॅ. झाकीर हुसेन रुग्णालय तसेच बिटको रुग्णालयात दाखल असलेल्या बहुतेक रुग्णांना घरचा जेवणाचा डबा येत हाेता. त्यामुळे येथे किती रुग्णांना जेवण, चहा, नाष्टा दिला गेला, याची कुठलीही नाेंद या बिलात नाही. रुग्णांना घरचाच डबा येत हाेता तर मग एवढे बिल झालेच कसे? असा सवालही पाटील यांनी उपसि्थत केला आहे.

  निविदा न काढताच ठेका
  महापािलकेत भाजपाची सत्ता आहे. भाजपाचेच गटनेते जगदीश पाटील यांनी सवेत असूनही प्रशासनाला खडेबाेल सुनावत रुग्णांच्या नावाखाली लाखो रुपये लाटण्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोविड सेंटरमध्ये कोरोना संसर्गित दाखल रुग्णांवर उपचार सुरू असताना त्यांना सकाळी व सायंकाळी भोजन महापालिका ठेकेदारामार्फत पुरवते. रुग्णांकरिता चहा, भोजन, नाश्त्याच्या बिलापोटी ठेकेदारांनी मेरी व समाजकल्याण कोविड सेंटर, बिटको हॉस्पिटलसाठी १९ लाख ८० हजार, ठक्कर डोमकरिता २५ लाख तर बिटको रुग्णालयासाठी ३० लाख पन्नास हजार रुपये बिल अदा करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीवर मंजुरीसाठी सादर केला आहे. हा प्रस्ताव संशयास्पद असून प्रस्तावामध्ये एकूण किती रुग्णांना भोजन देण्यात आले याचा उल्लेख नाही. भोजन पुरवठा करण्याचे ठेके कधी काढण्यात आले तसेच स्पर्धात्मक निविदा न मागविता ठेकेदार निश्चित करण्यात आले तसेच किती रुग्णांना ठेकेदारांनी चहा, नाश्ता, भोजन दिले याची यादीच सादर केली नसल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. पाऊण कोटी रुपयांचे बिल काढताना ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून बिले काढली जात असल्याचा आराेप पाटील यांनी व्यक्त करीत संबंधित बिल अदा करू नये तसेच चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

  ८० टक्के रुग्ण घरगुती विलगीकरणांमध्ये असताना पाऊण कोटीचा खर्च कसा झाला? महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये भोजन देणाऱ्या ठेकेदारांची चौकशी झाली पाहिजे. खर्चाला मान्यता देताना ठेकेदार कसे निश्चित झाले याची चौकशी व्हावी.

  - जगदीश पाटील, गटनेते, भाजप