uday samant

नाशिकमध्ये गंगापूर स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात त्यांनी बैठक आयोजित केली होती. विद्यापीठाकडे जात असताना त्यांचा ताफा अडवण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

नाशिक : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant)  हे नाशिक दौऱ्यावर आहेत. शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी तसेच अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज नाशिक येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच त्यांना काळे झेंडे (black flags) दाखवण्यात आले.

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ या कार्यकर्त्यांना अटक (arrested) करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे विविध विद्यापीठांच्या परीक्षांचा आढावा घेण्यासाठी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज नाशिकमध्ये गंगापूर स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात त्यांनी बैठक आयोजित केली होती. विद्यापीठाकडे जात असताना त्यांचा ताफा अडवण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दडपशाही करुन कार्यकर्त्यांवर कारवाई केली असा आरोप अभाविपच्या वतीने अभाविपचे प्रदेश मंत्री स्वप्निल बेगडे यांनी केला आहे.

उदय सामंत यांनी या घटनेचा निषेध केला आहे वरिष्ठांच्या नजरेत आपण यावं आणि काहीतरी पद मिळावे यासाठी अभाविपच्या वतीने राज्यात सर्वत्र आपल्या दौऱ्यात अशीच आंदोलने करण्यात येत आहेत मात्र आपण दादागिरीला घाबरणार नाही, संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नये असे आपले मत आहे त्यामुळे तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते मात्र त्यांनी अशी दिखाऊ आंदोलन करू नये असा टोला सामंत यांनी लगावला आहे.