उज्ज्वल शाळेच्या विद्यार्थिनींनी साकारले ‘महिषासूरमर्दिनी’चे रूप

सर्व विद्यार्थिनींनी नऊ दिवसाचे नऊ रंगाच्या साड्या परिधान करून 'स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, मुलगी शिकवा असा संदेश देत नवरात्रीच्या नऊ रूपांचे महत्व रूप साकारले. यात तनुश्री कोळी, स्नेहा गुंजाळ, प्रीती गायकवाड, अक्षरा आहिरे, दीक्षा पवार, चंचल पाटील, रीत ढिलोर, पायल कोळी, मंगेश पगारे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

    मालेगाव : शहरातील सोयगाव येथील किनो इज्युकेशन संचलित उज्ज्वल प्राथमिक शाळा व शिशू विहार शाळेच्या विद्यार्थिनींनी नवरात्रोत्सवानिमित्त देवीचे नऊ रूपे साकारत महिषासूराच्या वधाचा जिवंत देखावा साकारला.

    यांनी घेतला सहभाग
    यावेळी सर्व विद्यार्थिनींनी नऊ दिवसाचे नऊ रंगाच्या साड्या परिधान करून ‘स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, मुलगी शिकवा असा संदेश देत नवरात्रीच्या नऊ रूपांचे महत्व रूप साकारले. यात तनुश्री कोळी, स्नेहा गुंजाळ, प्रीती गायकवाड, अक्षरा आहिरे, दीक्षा पवार, चंचल पाटील, रीत ढिलोर, पायल कोळी, मंगेश पगारे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

    यांचे मार्गदर्शन
    उज्ज्वल शाळेत नवरात्र निमित्त विविध उपक्रम साजरे करण्यात येत आहेत. देवीची प्रतिकृती, रंगोलीद्वारे देवीचा मुखवटा, नऊ रंगाद्वारे देवीचे नऊ रूपे साकारणे आदी उपक्रमांचा समावेश आहे. संस्थेचे अध्यक्ष रईस शेख, मुख्याध्यापिका अर्चना गरुड यांनी उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना उपशिक्षिका स्वाती आहिरे, योगेश बच्छाव, स्वाती पाटील, अमोल ठोके, ज्योती भामरे, शीतल बेडसे, संगीता गायकवाड,पूनम पवार, निलेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले.