सरपंचपदासाठी बोलीने गाजलेली उमराणे ग्रामपंचायत ; रामेश्वर ग्रामविकासकडे

ग्रामदैवत रामेश्वर महाराज मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तब्बल दोन कोटी पाच लाख रुपयांचा लिलाव बोलीने उमराने गाव राज्यात गाजले होते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने १३ जानेवारीला निवडणूक प्रक्रिया रद्द केली होती. व दि. १२ रोजी ही निवडणूक पार पडली यात ८१.९२ टक्के मतदान झाले. एकूण ८ हजार ९४८ पैकी ७ हजार ३६० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला

    देवळा: सरपंचपदासाठी २ कोटी ५ लाख रुपयांच्या लिलाव बोलीने राज्यात गाजलेल्या देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वाखालील रामेश्वर विकास पॅनलला १७ पैकी १६ जागा मिळाल्या असून उमराणे बाजार समितीचे माजी सभापती विलास काका देवरे यांच्या नेतृत्वाखालील कर्मवीर ग्यानदेवदादा देवरे पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले.
    ग्रामदैवत रामेश्वर महाराज मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तब्बल दोन कोटी पाच लाख रुपयांचा लिलाव बोलीने उमराने गाव राज्यात गाजले होते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने १३ जानेवारीला निवडणूक प्रक्रिया रद्द केली होती. व दि. १२ रोजी ही निवडणूक पार पडली यात ८१.९२ टक्के मतदान झाले. एकूण ८ हजार ९४८ पैकी ७ हजार ३६० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
    रात्री आठ वाजता मतमोजणी होऊन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वाखालील श्री रामेश्वर ग्रामविकास पॅनलने १७ पैकी १६ जागांवर विजय संपादन केला तर माजी सभापती विलास काका देवरे यांच्या नेतृत्वाखालील कर्मवीर ग्यानदेव दादा देवरे पॅनलला एक जागा मिळाली. शेवटी मतदारांनी रामेश्वर महाराज मंदिराच्या मुद्द्यालाच मतदान करून सत्तापरिवर्तन घडवून आणल्याचे चित्र निकला अंती दिसून आले.