दुर्दैव! कृषिमंत्र्यांच्या तालुक्यातच शेतकऱ्याची आत्महत्या ; देवारपाडे येथील शेतकऱ्याने संपवले जीवन

तिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे खूप नुकसान झाले आहेत. मागील काही दिवसांपासून तालुक्यात अतिवृष्टीने थैमान घातल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे. यामुळे अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असताना देवारपाडे येथे सदर धक्कादायक घटना समोर आली आहे. कृषीमंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यातच शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    मालेगांव : तालुक्यातील देवारपाडे येथील एका शेतकऱ्याने शेतातील अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेल्या नुकसानीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शेतकरी शिवाजी दशरथ सरोदे (५५) यांनी शेतात आलेले पुर्णच पिक जोरदार अतिवृष्टीमुळे वाया जात असलेले पाहून व घेतलेले कर्ज कसे फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेतून आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली.

    तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे खूप नुकसान झाले आहेत. मागील काही दिवसांपासून तालुक्यात अतिवृष्टीने थैमान घातल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे. यामुळे अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असताना देवारपाडे येथे सदर धक्कादायक घटना समोर आली आहे. कृषीमंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यातच शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. अतिवृष्टी मुळे पिकांचे झालेले नुकसान व दोन लाखांचे हात उसनवार कर्ज यामुळे हतबल झालेल्या शिवाजी सरोदे यांनी काल गुरुवार दि.७ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. गट नंबर १९७/४ मध्ये जवळपास तीन एकर शेती असलेल्या या शेतात शिवाजी सरोदे यांनी कांदे, कपाशी, मका व बाजरी पिक घेतले होते. मात्र गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झाल्याने सरोदे हताश झाले होते. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान शेतात जावून आलेल्या शिवाजी सरोदे यांनी राहत्या घरात गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नात असा परिवार आहे.