सातपूर प्रभाग सभापतीचे अनोखे आंदोलन, खड्यात बसून घेतली ऑनलाईन महासभा

आपण नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहोत; परंतु त्यावर कार्यवाही होत नाही. सातपूरमधील (Satpur) बहुतांश भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. परंतु यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याचा निषेध म्हणून आज सातपूर प्रभागाचे सभापती संतोष गायकवाड यांनी चक्क खड्ड्यात बसून ऑनलाईन (online) सभेत सहभागी घेतला.

सातपूर : आपण नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहोत; परंतु त्यावर कार्यवाही होत नाही. सातपूरमधील (Satpur) बहुतांश भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. परंतु यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याचा निषेध म्हणून आज सातपूर प्रभागाचे सभापती संतोष गायकवाड यांनी चक्क खड्ड्यात बसून ऑनलाईन (online) सभेत सहभागी घेतला. महापौरसाहेब गेल्या तीन वर्षापासून आम्ही सातत्याने गंगापूर गाव, आनंदवली, सावरकर नगर, नरसिंह नगर, शंकर नगर, भावांजली नगर, अयोध्या कॉलनी, नवशा गणपती परिसर सुयोग कॉलनी, गुरुकुल गणेश, नगर सोमेश्वर कॉलनी, काळे नगर परिसर १,२,३ श्री गुरुजी हॉस्पिटलचा रोड पाईपलाईनरोड ह्या सर्व परिसरातील रस्ते म्हणजे ‘खड्ड्यात रस्ता,की रस्त्यात खड्डा’ तेच कळत नाही, अशी झाली आहे. रस्त्यांची दुरवस्थेमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

अनेक वाहनचालकांना यामुळे पाठीच्या मणक्यांचे आजार लागले तर छोट्या मोठ्या अपघातात अनेकांना दुखापतही झाली आहे. पाटील नेस्ट गुरुकुल कॉलनी या रस्त्याची अवस्था तर पहावतही नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. महापौरांनी नाशिक शहर खड्डेमुक्त करा, असे आदेश दिले आहेत. पण त्यांच्या आदेशालाही केराची टोपली दाखवली गेल्याचे दिसते आहे. सातपूर विभागातून सर्वात जास्त कर नाशिक महानगरपालिकेला मिळतो; तरीही या विभागाची अवस्था इतकी दयनीय झाली आहे, हे सांगणेसुद्धा लाजीरवाणे वाटते. आम्ही तुमच्याकडे भीक मागत नसून आमचा मूलभूत अधिकार आपल्याकडे मागत आहोत. पथदीप, रस्ते आणि पाणी हा आमचा मूलभूत अधिकार आहे, तो आम्हाला मिळालाच पाहिजे, असेही गायकवाड म्हणाले.

निवडणुकीच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले. ते या पाच वर्षांत नाशिकचा चेहरामोहरा बदलून दाखवणार होते, त्या आश्वासनाचे काय झाले? नाशिकचा तर चेहरामोहरा बदलला नाही तरी चालेले परंतू नागरिकांच्या मूलभूत गरजा तर सोडवा, फक्त पोकळ आश्वासने आणि गप्पा मारून नागरिकांचे प्रश्न सुटणार नाही, त्यासाठी ठोस पावले उचलावी लागणार आहे. जर आम्हाला आमच्या मूलभूत हक्कापासून आपण वंचित न ठेवता या वर्षाच्या अखेरपर्यंत ही कामे मार्गी न लावल्यास मी जनआंदोलन उभे करेन.

परिसरातील जनतादेखील आपल्याला जाब विचारल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी महापौरांना दिला. महापौरांनीदेखील मी स्वत:  आपल्या प्रभागात येऊन पाहणी करून सर्व प्रश्न सोडविता, असे आश्वासन दिले. या प्रसंगी उपस्थित विभाग प्रमुख विलास आहेर, उपविभाग प्रमुख कैलास जाधव, राहुल निकम, विजय विधाते,शिवा उगले, अमित सावंत, अमोल परदेशी, योगेश जाधव, बापू भोई, उपस्थित होते