तळेगावरोही, वडगावपंगु, रापलीचे ग्रामस्थ संतप्त ; भुयारी मार्ग ठरताेय त्रासदायक

  चांदवड : तालुक्यातील तळेगावरोही, वडगाव पगु, वाकी खुर्द, रापली या गावातील मध्य रेल्वेच्या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांची वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे ही कोंडी सोडवण्यासाठी पावसाच्या पाण्याचा त्वरित उपसा करावा किंवा बंद केलेले गेट पुन्हा सुरु करावे, अशी मागणी आमदार डॉ राहुल आहेर, डॉ आत्माराम कुंभार्डे, मनोज शिंदे यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे केली आहे.

  पाणी साचल्याने वाहतूक कोंडी
  तालुक्यामधील दक्षिण पूर्व भागामध्ये मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्याने लासलगाव ते मनमाड दरम्यानची मध्य रेल्वेच्या गेट क्रमांक १०६ ते ११२ दरम्यानच्या वाकी खुर्द, तळेगावरोही, वडगावपंगु रापली या गावांमध्ये काळामध्ये रेल्वे प्रशासनाने अंडरपास निर्माण करीत गेट कायमस्वरूपी बंद केले. त्यामुळे वाहतूक कोंडी हाेते. या भुयारी मार्गात सध्या पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. अाता यंत्राने पाणी काढले जात आहे. तरीही पाणी कायम अाहे. या ठिकाणी पूर्वीपासूनच जुन्या पद्धतीचा अंडरपास असल्याने तसे आजूबाजूला जाण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने आज अनेक गावांचा संपर्क त्या ठिकाणी तुटलेला आहे.

  आमदार डॉ. आहेरांकडून पाहणी
  चांदवडवरुन काेणाला कातरवाडी, रापली, वडगावपंगु व तळेगावरोही या गावांमध्ये जाता येत नाही. त्यामुळे तात्काळ बंद असलेले गेट खुले करून द्यावे. तसेच मागील किंवा कायमस्वरूपीचा अंडरपास व्यतिरिक्त अजूनही वेगळा काही मार्ग करता येईल का, याबाबत चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी पूर्व भागात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या भुयारी मार्गात साचलेले पावसाचे पाणी लवकर कसे उपसा केले जाईल यासाठी किंवा बंद केलेले गेट पुन्हा सुरु करून नागरिकांना वाहतूक सुरळीत करण्यात यावी यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी लक्ष घालावे, या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना तालुक्याचे आमदार डॉ. राहुल दादा आहेर, डॉ. आत्माराम कुंभार्डे, भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, योगेश ढोमसे, सचिन राऊत आदी मान्यवरांनी निवेदन दिले.