प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी नाशिक महापालिकेतर्फे मास्क नसलेल्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश काल पालकमंत्र्यांनी दिले. त्यानुसार महापालिकेच्या सहा विभागात एकूण ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.यामध्ये नाशिकरोड भागात ४० केसेस दाखल झाल्या असून, रुपये ८००० इतका दंड आकारण्यात आला आहे.

    नाशिक : वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी नाशिक महापालिकेतर्फे मास्क नसलेल्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश काल पालकमंत्र्यांनी दिले. त्यानुसार महापालिकेच्या सहा विभागात एकूण ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.यामध्ये नाशिकरोड भागात ४० केसेस दाखल झाल्या असून, रुपये ८००० इतका दंड आकारण्यात आला आहे. नाशिक पश्चिम भागात ३५ केसेस दाखल झाल्या असून, रुपये ७००० इतका दंड आकारण्यात आला आहे.

    नाशिक पूर्व भगत २१ केसेस दाखल झाल्या असून त्यांच्याकडून रुपये ९००० इतका दंड आकारण्यात आला आहे. सिडको भागात ३६ केसेस दाखल झाल्या असून रुपये ७२०० इतका दंड आकारण्यात आला आहे. तसेच पंचवटी भागात सर्वाधिक ५२ केसेस दाखल झाल्या असून रुपये १०४०० इतका दंड वसूल करण्यात आला आहे तर सातपूर भागात ४२ केसेस दाखल झाल्या असून, रुपये ८४०० इतका दंड आकारण्यात आला आहे. अशाप्रकारे महापालिकेने दिवसभरात एकूण रुपये ५०००० इतका दंड आकारला आहे.