काेराेना नियमांचे उल्लंघन ; हाॅटेल विवां रिसॉर्ट सील

शासनाच्या नियमांना तिलांजली देत या रिसाॅर्टच्या मालकाने पुन्हा एक लग्नसाेहळा पार पाडून शासन नियमांना केराची टाेपली दाखवल्याने अाश्चर्य व्यक्त हाेत आहे. या लग्न साेहळ्यामुळे सोमवार दि. ३१ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विवांत रिसॉर्टचे मालक हरनाम शेट्टी व व्यवस्थापन अधिकारी हुकुमचंद धामी यांना नोटीस बजावत रिसॉर्ट सिलबंद केल

    इगतपुरी : लाॅकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून तालुक्यातील मौजे तळेगाव शिवारातील हॉटेल विवांत रिसॉर्टमध्ये दोन दिवस लग्न सोहळा पार पडला. या लग्नसाेेहळ्यासाठी सुमारे तीनशे ते चारशे वऱ्हाडी जमल्याची मािहती मिळताच तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने रिसॉर्ट व्यवस्थापनावर कारवाई करत वीस हजार रूपये दंड वसूल केला.

    शासनाच्या नियमांना तिलांजली देत या रिसाॅर्टच्या मालकाने पुन्हा एक लग्नसाेहळा पार पाडून शासन नियमांना केराची टाेपली दाखवल्याने अाश्चर्य व्यक्त हाेत आहे. या लग्न साेहळ्यामुळे सोमवार दि. ३१ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विवांत रिसॉर्टचे मालक हरनाम शेट्टी व व्यवस्थापन अधिकारी हुकुमचंद धामी यांना नोटीस बजावत रिसॉर्ट सिलबंद केले.

    याबाबत उपविभागीय अधिकारी, इगतपुरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा तहसिलदार व पोलीस उपअधिक्षक अर्जुन भोसले, सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील, मंडल अधिकारी सुरेंद्र पालवे, पोलीस हवालदार मुकेश महिरे, राजेंद्र चौधरी यांनी ही कारवाई केली.सदर आदेश जिल्हा कार्यालयाकडे टपाली सादर केल्याची माहिती तहसिलदार परमेश्वर कासुळे यांनी दिली.

    कोवीड विषाणू साथीचा रोग पादुर्भाव प्रतिबंध कायद्याप्रमाणे जिल्हयात सर्व हॉटेल, धाबे, रिसॉर्ट आदी गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असुन शासन नियमांचे उल्लघंन केल्यास कारवाई केली जाईल. सील केलेले हॉटेल विवांत रिसॉर्ट काेराेना संपेपर्यंत बंद राहणार अाहे. तालुक्यातील सर्व हॉटेल व्यावसाियकांना विनंती आहे की कोणीही शासन नियमांचे उल्लघंन करू नये.

    - परमेश्वर कासुळे, तहसिलदार