Violent dispute among employees over Nashik corona vaccine

महापालिकेच्या सिन्नर फाटा आणि बिटको रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शुक्रवारी येथील दोनीही केंद्रावर प्रत्येकी कोव्हक्सीनच्या केवळ शंभर लस आल्या. यावेळी लस मिळत नसल्याने सामान्य जनता आणि रुग्णालय कर्मचारी यांच्यात प्रचंड वादंग निर्माण झाले. यावेळी प्रसंगावधान साधत बिटकोच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा काळे यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.

    नाशिक : महापालिकेच्या सिन्नर फाटा आणि बिटको रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शुक्रवारी येथील दोनीही केंद्रावर प्रत्येकी कोव्हक्सीनच्या केवळ शंभर लस आल्या. यावेळी लस मिळत नसल्याने सामान्य जनता आणि रुग्णालय कर्मचारी यांच्यात प्रचंड वादंग निर्माण झाले. यावेळी प्रसंगावधान साधत बिटकोच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा काळे यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.

    नाशिकरोडच्या जवळपास सर्वच केंद्रामध्ये सद्या कोव्हक्सीन पाठवले जाते आहे. कोव्हक्सीनची दुसरी लस घेणाऱ्या नागरिकांच्या ही लस उपयुक्त आहे. मात्र, पहिली कोशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांना दुसरी लस घेण्यासाठी कोशिल्ड मिळत नाही. ती कधी उपलब्ध होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत. वारंवार चकरा मारून देखील आम्हांला लस दिली जात नाही अशी खंत नागरिक व्यक्त करतांना दिसत होते. दुसरीकडे लस कमी मिळत असल्याने बिटकोचे स्थानिक प्रशासन हतबल झाल्याचे दिसले.

    शुक्रवारी केवळ शंभरच लस असून उर्वरित नागरिकांना लस न घेताच घरी परतावे लागणार असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. सकाळी सात वाजेपासून येथे नागरिकांनी लसीकरणासाठी हजेरी लावली होती. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असल्याचे पाहून डॉ. शिल्पा काळे यांनी जवळपास एक ते दीड तास त्यांनी लसीकरणाच्या ठिकाणी हजेरी लावली आणि नागरिकांच्या शंकेचे निरसन केले, तसेच प्रत्येकाला समजावून सांगितले.

    पहिली लस, दुसरी लस याचे स्वतंत्र नियोजन केले. नागरिकांचे समाधान केले. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. काळे यांच्या मध्यस्थीमुळे तणाव निवळून लसीकरण शांततेत अन सुरळीत सुरू झाले. त्यांनी हस्तक्षेप केला नसता तर प्रचंड गोंधळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली असती.