जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ; ब्रम्हगिरी फोडल्यास विनाश अटळ

ब्रह्मगिरी पर्वतावर अनधिकृतपणे झालेल्या उत्खननाचा विषय काही दिवसांपासून गाजत आहे. येथे बेकायदेशीर उत्खनन झाल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम गोदावरी नदीच्या उगमस्थानावर होणार असल्याची प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींमधून उमटत आहे.

  नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावरील उत्खननाच्या पार्श्वभूमीवर तरुण भारत संघाचे अध्यक्ष राजेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले आहे. यात ब्रम्हगिरीवर होत असलेले खोदकाम, स्फोट हे ब्रम्हगिरीच्या अस्तित्वाला बाधा पोहचविणारे आहे. तसेच गोदावरीनदीच्या उगमस्थानावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता अधिक असल्याने तातडीने हे खोदकाम थांबवावे, असे नमूद केले आहे.

  पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक
  याबाबत राजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली गोदावरी ज्या सहा राज्यांतून वाहते, तेथील पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. ब्रह्मगिरीवरील खोदकामाविरोधात राष्ट्रीय पातळीवर लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मोठ मोठी यंत्रे वापरुन ब्रह्मगिरी पर्वतावर खोदकाम केले जात आहे. या तीर्थक्षेत्राला बांधकाम व्यावसायिक पर्यटन स्थळात बदलण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातून पैसे कमावण्याचा माफियांचा प्रयत्न असल्याकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले. तीर्थ क्षेत्रावर होत असलेल्या या खोदकामाबद्दल स्थानिक पुजारी, संत, महंत, मठाधीश शांत बसल्याबद्दल अनेकांनी आक्षेप नोंदविला.

  केंद्र सरकारचं लसीकरणाबाबतचं धोरण चुकलंय का?

  View Results

  Loading ... Loading ...

  उगमस्थानावर विपरीत परिणाम
  ब्रह्मगिरी पर्वतावर अनधिकृतपणे झालेल्या उत्खननाचा विषय काही दिवसांपासून गाजत आहे. येथे बेकायदेशीर उत्खनन झाल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम गोदावरी नदीच्या उगमस्थानावर होणार असल्याची प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींमधून उमटत आहे.

  तर विनाश अटळ
  या घडामोडीनंतर राजेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. नद्यांचे संरक्षण ही सरकारची सांविधानिक जबाबदारी आहे. ब्रह्मगिरी-त्र्यंबकेश्वर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. ब्रम्हगिरी पर्वत तीर्थक्षेत्र आहे. हा पर्वत फोडल्यास विनाश अटळ असल्याचे राजेंद्र सिंह यांनी पत्रात स्पष्टपणे नमूद केले असल्याची माहिती राजेश पंडित यांनी दिली.