नाशिकमधील कोरोनाबाधित रुग्ण संख्येबद्दल छगन भुजबळांनी दिली दिलासादायक बातमी, काय म्हणाले ? : वाचा सविस्तर

'लहान मुलांना तिसरी लाट संभाव्य धोका लक्षात घेऊन टास्क फोर्स निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहितीही भुजबळ यांनी केली. नाशिकमध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांनी माहिती दिली.

    नाशिक : नाशिकमध्ये कोरोनाची परिस्थिती आता आटोक्यात आली असून अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठा सुधार झाला आहे जिल्ह्याच्या पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के एवढा आहे, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तसंच, ‘लहान मुलांना तिसरी लाट संभाव्य धोका लक्षात घेऊन टास्क फोर्स निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहितीही भुजबळ यांनी केली. नाशिकमध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांनी माहिती दिली.

    दरम्यान जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात आली आहे. जिल्ह्याच्या पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के एवढा आहे. आतापर्यंत 5587 बळी गेला असून मृत्यू दर 1.43 टक्के आहे. खाजगी हॉस्पिटलमधील 522 बळींची संख्या पोर्टलवर अपडेट होणं बाकी आहे आहे. 1.81 हा सरासरी मृत्युदर आहे. हॉस्पिटलमध्ये जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहे.

    म्युकरमायकोसिस 535 रुग्ण असून 206 झाले बरे झाले आहे. म्युकरमयकोसिसमुळे 54 जणांचा मृ्त्यू झाला आहे. खाजगीसह, शासकीय हॉस्पिटलमध्येही शस्त्रक्रिया सुरू आहे. 23420 एम्फोटेरेसिन बी इंजेक्शनची मागणी केली,मात्र 5970 इंजेक्शन  मिळाले आहे, अशी माहिती भुजबळ यांनी दिली. जिल्ह्यात,100 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन असून सर्व हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन पुरेसा आहे. निर्बंधात लॉन्स करीता शनिवार आणि रविवार परवानगी देण्यात आली आहे. 50 लोकांत लग्नसमारंभ करण्याचं बंधन आहे इतर सर्व निर्बंध कायम आहे. पुढील आठवड्यात आणखी शिथिलता करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असंही भुजबळ यांनी सांगितलं.

    तसेचं ‘राज्यातील मंत्र्यांचे बापजादा हे वारकरीच आहे. आमचं वारीवर प्रेम आहेच. पण गर्दी झाली तर कोरोना रोखणं अवघड जाणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा एकमुखी निर्णय घेतला आहे. बसमधूनच वारीला परवानगी देण्यात आली आहे. ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांना कोण सांगणार, असं म्हणत भुजबळांनी भाजपला टोला लगावला. ‘शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची 3 तास चर्चा ही हवामानावर निश्चित नाही. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे माहिती नाही’ असंही भुजबळ म्हणाले. ‘संभाजीराजे समतोल विचार करणारे आहे. नक्षलवाद्यांच्या पत्राबद्दल माहिती नाही. पण मराठा समाज समंजस आहे. कोणीतरी भ्रम निर्माण केला असावा, अशी प्रतिक्रियाही भुजबळ यांनी माओवाद्यांच्या पत्रावर दिली आहे.