You just escaped on bail; Don't speak too loudly ... Chandrakant Patil's stern warning to Chhagan Bhujbal

बंगालमध्ये ममता बॅनर्जी झाशीच्या राणीप्रमाणे लढल्या. त्याचा चंद्रकांतदादा पाटील यांना राग येण्याचे कारण नव्हते. मात्र पराभव पचविण्याची सवय नसल्याने त्यांना राग आला असावा. पण यापुढे त्यांना वारंवार असे पराभव पचावावे लागणार असल्याने चंद्रकांत दादा पाटील यांनी पराभव पचवायची सवय लावून घ्यावी असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.

    नाशिक : बंगालमध्ये ममता बॅनर्जी झाशीच्या राणीप्रमाणे लढल्या. त्याचा चंद्रकांतदादा पाटील यांना राग येण्याचे कारण नव्हते. मात्र पराभव पचविण्याची सवय नसल्याने त्यांना राग आला असावा. पण यापुढे त्यांना वारंवार असे पराभव पचावावे लागणार असल्याने चंद्रकांत दादा पाटील यांनी पराभव पचवायची सवय लावून घ्यावी असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.

    दरम्यान, सीबीआय, ईडी, यासारख्या संस्थाचा सत्तेमुळे उपयोग करतात असं मी ऐकल होत. पण माझे सगळे खटले सध्या कोर्टात सुरू आहे. माझ्या कोर्टात सुरू असलेल्या खटल्याबाबत मला भारी पडेल असे म्हणणारे पाटील कोण आहेत?असा सवालही भुजबळ यांनी केला. आता कोर्टाचे निर्णयही चंद्रकांत पाटीलच ठरवू लागले आहेत का ? कोर्टाचे निर्णय घेणारे हे कोण? अशी विचारणाही भुजबळ यांनी केली.

    पराभव पचवायची सवय नसल्याने चंद्रकांतदादा काहीही बोलू लागले आहे. माझ्या अटके दरम्यान माझे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ त्यांच्याकडे विनंत्या करायचे असेही ते म्हटल्याचे मी ऐकले. वास्तविक समीर यांना माझ्या अगोदर दोन महिनेपूर्वीच अटक झाली होती. त्यानंतर मला अटक झाली. असे असताना समीर हे काय जेल मधून पाटील यांना भेटायला जायचे का? माझ्या अटकेनंतर समीर जेलमधून कसा भेटायला जाईल.

    -छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक