Sanjay-Raut-Chandrakant-Patil

शिर्डी : अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर ऐंशी तासांचे सरकार आले नसते त्यावेळी त्यांनी आणलेले आमदार त्यांना टिकवता आले नाहीत अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री पवारांवर निशाना साधला. तसेच खासदार संजय राऊतांबद्दल प्रश्न विचारला असता काेण संजय राऊत? असे म्हणत त्यांनी राऊतांची खिल्ली उडविली.

शिर्डी : अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर ऐंशी तासांचे सरकार आले नसते त्यावेळी त्यांनी आणलेले आमदार त्यांना टिकवता आले नाहीत अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री पवारांवर निशाना साधला. तसेच खासदार संजय राऊतांबद्दल प्रश्न विचारला असता काेण संजय राऊत? असे म्हणत त्यांनी राऊतांची खिल्ली उडविली.

तुम्ही सरकार चालवा…
भाजपाचे आमदार आपल्या संपर्कात असल्याच्या पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देतांना ते पुढे म्हणाले, तुमचे आघाडी सरकार उत्तम चालले अाहे, का आमच्या लोकांना आकर्षित करता. अजितदादा खूप चांगले नेते आहेत, चांगले काम करतात. गंमत निर्माण होईल, असे बाेलले तर त्यांची प्रतिष्ठा कमी होईल. तुम्ही सरकार चालवा; आम्ही विरोधी पक्ष सांभाळू, असेही पाटील म्हणाले.

पाटील यांनी गुरूवारी सायंकाळी साईदरबारी हजेरी लावली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, गजानन शेर्वेकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, युवा मोर्चाचे सचिन तांबे, रविंद्र कोते, राजेंद्र गोंदकर आदींची उपस्थीती होती.

काेण संजय राऊत?
पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देतांना कोण संजय राऊत म्हणत त्यांनी राऊतांची उडवली खिल्ली. एकीकडे डॉ. बाबासाहेबांच्या घटनेला मानायचे तर घटनेच्या चौकटीतील गोष्टी मानाव्या लागतील. एखाद्या घटने संदर्भात न्यायालयात जायचे नाही का? न्यायालनाने निर्णय द्यायचा नाही मग काय यांची दादागिरी चालणार का? यांना निवडणूक आयोग, कोर्टाचे निर्णय मान्य नाही. डॉ. बाबासाहेबांच्या घटनेवर देशाचा कारभार उत्तम सुरू आणि पुढेही सुरू राहिल. हे सर्व तुम्हांला मान्य नाही का? असा सवालही चंद्रकांत पाटलांनी उपसि्थत केला.

शिवसेना संपत चालली आहे
निवडणूकांच्या बाबत बोलतांना पाटील म्हणाले की, तीन पक्ष एकत्र आल्यावर त्यांची ताकद जास्तच होणार. ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीचा प्रयत्न होईल मात्र आम्हीसुद्धा ताकदीने निवडणुका लढवणार आहोत. शिवसेना सोबत नसल्याने आमच नुकसान होत. मात्र शिवसेना सत्तेत असताना त्यांचेही मोठे नुकसान होत आहे. आम्हाला काय फरक पडत नाही; मात्र शिवसेना संपत चालली आहे.