नामदार गडकरी दखल घेणार का? ; नाशिक-सिन्नर महामार्ग वाहधारक प्रवाशासाठी ठरतोय जीवघेणा

नाशिक - सिन्नर महामार्गावर गेली पंधरा दिवसांत जवळपास ६ ते ७ प्रवाशांचा जीव या रस्त्याने घेतल्याने अनेकांचे कुंटूंबातील कुंटूंबकर्ता गेल्याने परिवार उध्दबस्त झाली आहे. या सर्व घटनानां एकमेव रस्त्याची खड्डे, व अपूर्ण असलेले काम तसेच टोलवेज प्रशासनाचा दिरंगईपणा कारणीभूत आहे.

    नाशिकरोड : गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोड ते सिन्नर  या महामार्गा दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.  गेली पंधरा दिवसांत जवळास या महामार्गाने सहा प्रवाशी वाहनधारकांचा जीव घेतला आहे. असे असताना देखील नाशिक-सिन्नर टोलवेज (चेतक एन्टरप्रायजेस) कंपनीकडून रस्त्याची कोणतीही दुरुस्ती होत नाही उलट रस्त्याचे काम अपूर्ण असताना सुद्धा टोलवेज कंपनी गेली चार वर्षांपासून शंभर टक्के वाहनधारकांकडून टोल वसुली करून वाहनधारकांची बेधुंद लूट करत आहे. आज रस्त्यावर पडलेले मोठे – मोठे खड्डे यांनी आजपर्यंत अनेकांचा जीव घेतला आहे. रस्त्याला पडलेले खड्डयाची दुरुस्तीसाठी अनेकदा विविध राजकीय पक्षासह सामाजिक संघटनांनी टोल प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केली. मात्र नाशिक – सिन्नर टोल वीज कंपनीकडून केवळ तात्पुरत्या स्वरूपाचे आश्वासन देऊन वेळ ढकलली जात आहे आता या नाशिक-सिन्नर महामार्गाकडे स्वतः केंद्रीय अवजड परिवहन मंत्री नामदार नितीन गडकरीं  आपणचं  लक्ष केंद्रीत करुन वाहनधारकांना न्याय द्यावा, जेणे करुन भविष्यात कुणा वाहनधारकांचा जीव जाणार नाही आम्हा न्याय मिळेल का न्याय?  उर्वरित हळुवारपणे चालणारे सिन्नर फाटा चेहडी पर्यंतचे रस्त्याचे २. किलोमिटरच्या कामाला गती मिळावी अशी मागणी पंचक्रोशीतील वाहनधारक आपल्या नाशिक दौ-याच्या निमित्ताने करत आहे.

    नाशिक – सिन्नर महामार्गावर गेली पंधरा दिवसांत जवळपास ६ ते ७ प्रवाशांचा जीव या रस्त्याने घेतल्याने अनेकांचे कुंटूंबातील कुंटूंबकर्ता गेल्याने परिवार उध्दबस्त झाली आहे. या सर्व घटनानां एकमेव रस्त्याची खड्डे, व अपूर्ण असलेले काम तसेच टोलवेज प्रशासनाचा दिरंगईपणा कारणीभूत आहे. गेली सन २०१७ पासुन तर आज पर्यत रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे आणि टोल वसुली मात्र रस्ता अपूर्ण असतानां देखील सुरुच असुन टोल कडून कोणतीही सुविधा उपलब्ध नसून केवळ पैसे वसुली सुरु ठेवली अजून किती प्रवाशांचा जीव टोल कंपनी घेणार? असा सवाल शिंदे,पळसे,चेहडी गावच्या नागरिकांनी उपस्थित केला आहे. आज नाशिक सिन्नर मार्गावर पंधरा दिवसापूर्वीच पळसे गावच्या हेमंत कुमावत या तरुणाचा चेहडीच्या पडलेल्या खड्ड्यांनी जीव घेतला.मात्र घरातील एका आई बाप्पाचा मुलगा अपघातात गेला या अपघातग्रस्त कुंटूंबास प्रशासन काही मदतीचा हात तर दिला नाही पंरतु कोणी त्या कुंटूबाला टोलवेज कंपनी प्रशासनाकडून विचारपूस देखील केली गेली नाही याला काय म्हणायचे? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

    गेली अनेकदा शिंदे व पळसे ग्रामपंचायत , शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार योगेश घोलप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, रवींद्र पगार, गणेश गायधनी तर मनसेचे अंकुश पवार ,सुनील गायधनी, रोहन देशपांडे अशा अनेक पक्ष्यांच्या अनेकांनी नाशिक-सिन्नर महामार्गाच्या दुरुस्तीसह  स्थानिकांच्या प्रश्नवर आंदोलन करूनही कोणतीही दखल टोल प्रशासनाने घेतली नाही याचा अर्थ टोल प्रशासनाला संबंधित राष्ट्रीय महामार्गाचे व बांधकाम विभागाचे अधिकारी तर पाठीशी घालत नाही ना.. की पोलीस प्रशासन पाठीशी घालते ? असा सवाल मात्र सर्वसामान्य नागरिकांना पुढे आता उभा ठाकला आहे. सदर टोल प्रशासनाने रस्त्यांची झालेली दुरवस्था ही तातडीने दुरुस्ती करावी तसेच बंगाली बाबा पुल,शिंदे पुलासह चेहडी दारणानदीवरील पुलाचे लावलेले पथदीप अनेक महिन्यापासुन मोठ्याप्रमाणात बंद अवस्थेत असुन खासदार हेमंत गोडसेनी दहा दिवसांपूल्वीच टोलवेज कंपनीला आठ दिवसाचा अल्टीमेट देऊन न नही कोणतीही कार्यवाही केली गेली नाही अनेक आदोंलने करुनही टोल प्रशासनाची मनमानी सुरुच असुन संबधितानी ठोस पाऊल उचलने गरजेचे आहे.