सकारात्मक दृष्टीकाेन बाळगून गुन्हेगारी वृत्ती साेडा : डाॅ. साेनसीस

गुन्हेगारी जीवन सोडा, सर्वसामान्य जीवन जगा या पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्या गुन्हेगार सुधार योजनेंंतर्गत सातपूर पोलिस ठाण्यात सातपूर, अंबड, व इंदिरानगर पाेलिस ठाण्याच्या रेकाॅर्डवर असलेल्या ६९ युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले. काेणीही जन्मतः गुन्हेगार नसतो. परिस्थितीने तो गुन्हेगार बनतो, आशा युवकांना ध्येय व पक्का विचार केल्यास यश नक्कीच मिळते असे मार्गदर्शन युवकांना करण्यात आले.

    सातपूर : भूतकाळात काहीही घडले तरी मनाने व मेंदूने ठरवले तर जगात काहीही अशक्य नाही. मानवी मनाची ताकद अफाट आहे. मनात कितीही क्लेश असला तरी भूतकाळ विसरत सकारात्मक दृष्टिकोन बाळगून गुन्हेगारी वृत्ती साेडा व सर्वसामान्य जीवन जगा, असे आवाहन मानसाेपचार तज्ञ तथा आयएमएचे अध्यक्ष डाॅ. हेमंत साेननीस यांनी गुन्हेगार सुधार मेळाव्यात केले. यावेळी ६९ युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले.

    गुन्हेगारी जीवन सोडा, सर्वसामान्य जीवन जगा या पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्या गुन्हेगार सुधार योजनेंंतर्गत सातपूर पोलिस ठाण्यात सातपूर, अंबड, व इंदिरानगर पाेलिस ठाण्याच्या रेकाॅर्डवर असलेल्या ६९ युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले. काेणीही जन्मतः गुन्हेगार नसतो. परिस्थितीने तो गुन्हेगार बनतो, आशा युवकांना ध्येय व पक्का विचार केल्यास यश नक्कीच मिळते असे मार्गदर्शन युवकांना करण्यात आले.काैशल्य विकास प्रशिक्षण तसेच रोजगार संधी या बाबत प्रकल्प अधिकारी संदीप गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलिस उपायुक्त विजय खरात, सहायक पाेलिस आयुक्त सोहिल शेख, सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे, अंबडचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी, इंदिरानगरचे वरीष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर, युनिट २ चे निरीक्षक अजय शिंदे, सहायक निरीक्षक हेमंत नागरे आदी उपस्थित हाेते.