जिल्हाधिकाऱ्यांचा डाॅक्टर्स असाेसिएशनला इशारा निर्णय मागे घ्या ; अन्यथा कारवाई

जिल्हाधिकार्‍यांनी खासगी रुग्णालयांच्या डॉक्टर असोसिएशनशी संपर्क साधून अडचणी मांडण्यास सांगितले आहे. यासोबत कोरोना महामारीत ८० टक्के बेड अधिग्रहित केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे डॉक्टर असोसिएशन आता काय भूिमका घेणार? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

  नाशिक : काेराेना काळात माेठ्या प्रमाणात दगदग झाल्याने आम्ही आणि आमचा कर्मचारी वर्ग मानसिक तसेच शारीिरकदृष्ट्या थकला असल्याने आम्ही काेराेनाबाधितांना दाखल करून घेणार नाही, अशी भूमिका जाहीर करणाऱ्या डाॅक्टर्स असाेिसएशनला जिल्हाधिकाऱ्यांनी दणका दिला. काल डाॅक्टर्स असाेसिएशनने याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले हाेते.

  डाॅक्टर्स असाेिसएशनच्या या निर्णयाबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी असोसिएशनशी संपर्क साधून या काळात अशी भूमिका घेणे योग्य नाही. त्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी त्या समाेर बसून मांडाव्यात, मात्र काेराेेनाच्या काळात अशी आडमुठी भूमिका घेतली तर कठाेर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

  जिल्ह्यातील १७२ खाजगी रुग्णालयांच्या प्रमुखांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांना याबाबत पत्र लिहिले आहे. त्या पत्रात त्यांनी आम्हाला कोरोना उपचाराच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी केली आहे. तसेच आम्ही मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या थकलो आहोत, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सध्या कोरोनाचा आलेख उतरणीला लागला असून रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना शासकीय रुग्णालयांत दाखल करण्यात यावे, अशी मागणीही या पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

  हॉस्पिटल असोसिएशनच्या या भूमिकेबाबत बोलतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, खासगी रूग्णालयांना काही अडचणी येत असतील तर त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्यासाठी आयुक्त आणि जिल्हाधिकारी सक्षम आहेत. रूग्णालयांनी त्यांना येणार्‍या अडचणी मांडाव्यात, पण असंविधानिक भूमिका घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना रूग्णांवर उपचार करताना नागरिकांकडून येणारा दबाव हे डॉक्टरांनी मुख्य कारण दिल्याचे समजते.

  सहमती हाेईल!
  जिल्हाधिकार्‍यांनी खासगी रुग्णालयांच्या डॉक्टर असोसिएशनशी संपर्क साधून अडचणी मांडण्यास सांगितले आहे. यासोबत कोरोना महामारीत ८० टक्के बेड अधिग्रहित केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे डॉक्टर असोसिएशन आता काय भूिमका घेणार? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून आहे.