नाशिकमध्ये सॅनिटाईझ करताना लागली आग, महिलेचा मृत्यू

  • नाशिकमध्ये महिलेचा सॅनिटाईजरमुळे लागलेल्या आगीत मृत्यू झाला आहे. ही घटना २० जूलै २०२० रोजी घडली आहे. वीज गेल्याने महिलेने मेनबत्ती लावली होती. या मेनबत्तीच्या प्रकाशात ती घराला सॅनिटाईज करत होती. सॅनिटाईजर मेणबत्तीच्या संपर्कात आल्याने पेट घेतला. यामुळे महिला ९० टक्के भाजली होती.

नाशिक – कोरोनाने देशात थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्गही वेगाने पसरत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी मास्क वापरा, सुरक्षित अंतर पाळा, हात वारंवार धुवा, हाताला सॅनिटायझर लावा असे सांगितले जाते. परंतु सॅनिटायझरचा अतिवापर लोकांच्या जीवावर बेतायला लागला आहे. सॅनिटाईजरमुळे आग लागल्याने नाशिकमध्ये महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नाशिकमध्ये महिलेचा सॅनिटाईजरमुळे लागलेल्या आगीत मृत्यू झाला आहे. ही घटना २० जूलै २०२० रोजी घडली आहे. वीज गेल्याने महिलेने मेनबत्ती लावली होती. या मेनबत्तीच्या प्रकाशात ती घराला सॅनिटाईज करत होती. सॅनिटाईजर मेणबत्तीच्या संपर्कात आल्याने पेट घेतला. यामुळे महिला ९० टक्के भाजली होती. आगीचा भडका उडाल्याने महिला मोठ्या प्रमाणात भाजली आहे. या महिलेचे नाव रजबीया शेख आहे. तीला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु रुग्णालयात उपचारा दरम्यान २४ जुलैला मृत्यू झाला आहे. 

या घटनेबाबत पोलीसांनी सॅनिटाईजरचा पेटवलेल्या मेणबत्तीच्या संपर्कात आल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे नाशिक इंदिरानगर पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.