येवला कृउबा साेमवारपासून सुरू ; काेराेना चाचणी करूनच मिळणार प्रवेश : मुख्य प्रशासक पवार

प्रशासनाच्या आदेशानुसार बाजार समिती आवारात प्रवेश करतांना प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असून, विनामास्क प्रवेश करू दिला जाणार नाही. शेतकरी बांधवांनी शेतीमाल विक्रीसाठी आदल्या दिवशी बाजार समितीत मुक्कामी येऊ नये. ज्या दिवशी लिलाव असेल त्या दिवशी सकाळनंतरच आवारात यावे.

  येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सोमवार दिनांक २४ मे पासून शेतमाल लिलाव सुरू होणार असून बाजार समितीच्या आवारात येणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व घटकांची कोरोना चाचणी करूनच प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंतराव पवार यांनी दिली आहे.

  प्रतिबंधात्मक उपाय
  १९ मे रोजी येवला पोलिस स्टेशन येथे झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या सुचनांनुसार बाजार समितीचे मुख्य आवार व उपबाजार अंदरसुल आवारावरील कांदा, मका, भुसाराान्य व भाजीपाला इ. शेतीमालाचे लिलावासाठी येणा-या प्रत्येकाची प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

  गेटवरच चाचणी
  प्रशासनाच्या आदेशानुसार बाजार समिती आवारात प्रवेश करतांना प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असून, विनामास्क प्रवेश करू दिला जाणार नाही. शेतकरी बांधवांनी शेतीमाल विक्रीसाठी आदल्या दिवशी बाजार समितीत मुक्कामी येऊ नये. ज्या दिवशी लिलाव असेल त्या दिवशी सकाळनंतरच आवारात यावे. वाहनासोबत फक्त एकाच व्यक्तीस प्रवेश दिला जाणार असून त्या व्यक्तीची बाजार समिती गेटवरच कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

  या नियमांचे पालन करा
  याअगोदर ज्या शेतक-यांनी व व्यापारी यांनी कोरोना चाचणी करुन घेतली आहे त्यांनी कोरोना चाचणीचा अहवाल सोबत आणावा, बाजार समितीत आल्यानंतर दोन वाहनांमध्ये किमान ३ ते ५.५ फुट अंतर सोडावे, ज्या वाहनाचा लिलाव सुरु असेल त्या शेतक-यानेच वाहनाजवळ थांबावे, सर्वांनी सोशल डिस्टन्िसंगचे पालन करावे, बाजार समिती घटकांना कोरोना चाचणी करुनच आवारात प्रवेश दिला जाणार असल्याने प्रत्येकाने आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी व शासन व स्थानिक प्रशासनामार्फत कोरोनासंदर्भात वेळोवेळी निर्गमित होणा-या सुचना व आदेशाचे काटेकोरपणे पालन करुन बाजार समितीस सहकार्य करावे, असे आवाहन बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंत पवार, सचिव के. आर व्यापारे व सर्व प्रशासकीय संचालक मंडळाने केले आहे.