नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यामागचे कारण दडले आहे एका पौराणिक कथेत, अधिक माहिती जाणून घ्या

शारदीय नवरात्र(Shardiya Navratri 2021) हे असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते.नवरात्रोत्सव(Why Navratri Is Celebrated For 9 Days) साजरा करण्यामागचे कारण पौराणिक कथेमध्ये (Historical Story Of Navratri)दडले आहे.

    हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला नवरात्रीला(Navratri 2021) सुरुवात होते. हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी नवरात्रोत्सव ७ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. यावेळी नवरात्रीत दोन तिथी पडल्यामुळे ८ दिवसांचा नवरात्रोत्सव आहे. शारदीय नवरात्र(Shardiya Navratri 2021) हे असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते.नवरात्रोत्सव(Why Navratri Is Celebrated For 9 Days) साजरा करण्यामागचे कारण पौराणिक कथेमध्ये (Historical Story Of Navratri)दडले आहे. ही पौराणिक कथा जाणून घेऊयात.

    असे म्हटले जाते की, महिषासुराने ब्रह्माजींना त्याच्या तपश्चर्याने प्रसन्न केले होते. महिषासुराने ब्रह्माजींकडे वरदान मागितले होते की कोणताही देव, राक्षस किंवा पृथ्वीवर राहाणारा व्यक्ती त्याला मारु शकणार नाही. ब्रह्माजींच्या वरदानानंतर त्याने पृथ्वीवर दहशत निर्माण केली. महिषासुराचा वध करण्यासाठी दुर्गा देवीचा जन्म झाला. देवी दुर्गा आणि महिषासूर यांच्यात नऊ दिवस  युद्ध झाले आणि दहाव्या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला.

    अन्य एका मान्यतेनुसार रामाने रामेश्वरम येथे नऊ दिवस देवी दुर्गाची पूजा केली होती. देवी दुर्गा प्रसन्न झाली आणि श्री रामाला विजयाचा आशीर्वाद दिला. यानंतर, दहाव्या दिवशी रामाने रावणाशी युद्ध करत त्याचा वध केला आणि लंकेवर विजय मिळवला, म्हणून दहावा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो.