यादवराजा देवगिरी यांची कुलस्वामिनी माता रेणुका: महाराष्ट्राचे जागृत शक्तिपीठ

आख्यायिका आहे की, दत्तात्रयांचा जन्मदेखील याच माहूर गडावर झाला. गडावर माता रेणुकेचे कमलाकर असे देऊळ आहे. हे देऊळ यादवराजा देवगिरी यांनी ८०० ते ९०० वर्षांपूर्वी पूर्वी बांधलेले असावे.

    देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ पीठ म्हणजे माहूरची रेणुका होय. माहूरगडाची रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी. आख्यायिका आहे की, दत्तात्रयांचा जन्मदेखील याच माहूर गडावर झाला. गडावर माता रेणुकेचे कमलाकर असे देऊळ आहे. हे देऊळ यादवराजा देवगिरी यांनी ८०० ते ९०० वर्षांपूर्वी पूर्वी बांधलेले असावे.

    हे देऊळ वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आले असून गाभारा आणि सभामंडपात विभागलेले आहेत. गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. गाभाऱ्याचे प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याचे आहे. देवीचा मुखवटा पूर्वाभिमुख असून तब्बल 5 फुटी उंच आणि रुंदी 4 फुटी इतकी आहे. जवळच तेलाचा आणि तुपाचा दिवा तेवलेला आहे. भाळी मळवट भरलेले असून मुखात तांबूल घेऊन आहे.

    अशी आहे आख्यायिका
    माता रेणुकाच्या कथेनुसार रेणुका मातेचा वध त्यांच्या मुलाने म्हणजे परशुरामाने आपल्या पितृ आदेशावरून केले. नंतर परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागली ते दु:खी झाले. त्याच क्षणी आकाशवाणी झाली. तुझी आई तुझ्या दर्शनास येईल. पण तू मागे वळून बघू नकोस; परंतु परशुरामाला आपल्या आईशी भेटण्याची ओढ लागली होती. त्यामुळे त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकेमातेचा चेहराच जमिनीतून वर आलेला होता. परशुरामाला तेवढेच दिसले. त्यामुळे माहूरगडावर रेणुकेच्या या तांदळारूपातील मुखाचीच पूजा केली जाते. या डोंगरावर परशुरामाला मातेचे दर्शन घडले त्यामुळे या डोंगराला ‘मातापूर ‘ म्हटले जाऊ लागले आणि शेजारीच आंध्रप्रदेशातील ‘ऊर’ गाव असल्यामुळे ‘माऊर’ आणि आता ते माहूर म्हणून ओळखले जाते.

    दक्षिणाभिमुख प्रवेशद्वार
    सभामंडपाच्या परिसरात महाकाली, महालक्ष्मी आणि तुळजाभवानीच्या मूर्ती आहेत. परशुरामाचे देऊळ, दर्शनी भागास गणपतीचे देऊळ, विष्णू कवी मठ, पांडवतीर्थ, औदुंबर झरा, जमदग्नी स्थान, अमृत कुंड, आत्मबोध तीर्थ, मातृ तीर्थ आणि राम तीर्थ इत्यादी तीर्थ आहेत.