राज्यभरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; देवीच्या दर्शनाला नागरिकांची तुफान गर्दी

    मुंबई : आजपासून सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला (Navaratrotsav) सुरुवात होणार आहे. कोरोना महामारीनानंतर प्रथमच नवरात्रोत्सव हा निर्बंध मुक्त साजरा होत असल्याने भाविकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून लोकांनी पहिल्या दिवसापासूनच देवीच्या मंदिराबाहेर गर्दी केलेली आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता आणि नाशिकच्या वणीची सप्तश्रुंगी देवीचे मंदिर अशी विविध भागातील अनेक मंदिर नवरात्रोत्सवानिमित्त सजली आहेत. तसेच नवरात्रोत्सवानिमित्त राज्यातील साडेतीन शक्तीपीठं असलेल्या देवस्थानांमध्ये नवरात्रोत्सवाची यंदा जय्यत तयारी करण्यात आली आहे.

    तुळजापूरची तुळजाभवानी देवी

    कोल्हापूरची अंबाबाई :

    माहूरची रेणुकामाता :

    नाशिकच्या वणीची सप्तश्रुंगी देवी :

    दोन वर्षांनंतर हा शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. याच दरम्यान देवीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. या काळात काही अघटित घडू नये यासाठी मंदिर प्रशासनाने आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.नवरात्रोत्सव निमित्ताने पुढील दहा दिवस आदिशक्तीचा जागर पहायला मिळणार आहे. तसेच ठिकठिकाणी जत्रा तसेच गरबा कार्यक्रमांचेही आयोजन केले जाईल. राज्यात नवरात्रोत्सवाची जय्यात तयारी केली असून, यंदा कोल्हापूर, तुळजापूरमध्ये रेकॉर्ड ब्रेक भाविकांची गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.