बटाट्याची शेव, खास उपवासाची स्पेशल रेसिपी

  नवरात्रीत नेहमी नेहमी उपवासाला काय खायला करायचं असा प्रश्न पडतो पण आज आम्ही तुम्हाला एक क्लासी उपवासाची रेसिपी सांगणार आहोत.

   

  साहित्य :

  • बटाटे
  • हिरव्या मिरच्याची बारीक पेस्ट
  • जिरेपूड
  • राजगिऱ्याचे पीठ
  • तेल
  • खाण्याचा पिवळा रंग.

   

  कृती :

  • बटाटे स्वच्छ धुवून घ्या.
  • या बटाट्यांना कुकरमध्ये वाफवून गार करा.
  • त्यानंतर पुरणयंत्रातून बटाटे बारीक वाटून घ्या.
  • त्यात हिरव्या मिरच्याची पेस्ट, मिठ, जिरेपूड, राजगिऱ्याचे पीठ, आणि हलका पिवळा रंग टाका
  • त्याला एकत्र मळा आणि शेवपात्रातून शेव पाडा.
  • त्यानंतर तळा. कुरकुरीत शेव तयार होणार