नवरात्री निमित्त रेल्वेने प्रवाशांना खास भेट; उपवासाची ‘स्पेशल थाळी मिळणार

  
  

  यंदा २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. या उत्सवात अनेक घरांमध्ये घटस्थापना तसेच कुलदेवतेची पूजा केली जाते. यादरम्यान शहरात राहणारे लोक आपल्या घरी जातात. अशा परिस्थितीत उपवास करणाऱ्या लोकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आयआरसीटीसीने ‘सप्तक्रांती’ आणि ‘वैशाली सुपरफास्ट’ सारख्या प्रमुख गाड्यांच्या पॅन्ट्रीकार ऑपरेटरच्या ‘नवरात्र स्पेशल मेन्यू’ च्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. भारतीय रेल्वेच्या प्रमुख गाड्यांच्या पॅन्ट्रीमध्ये फलाहाराची व्यवस्था केली जात आहे.

  एवढेच नाही तर याची शुद्धता राखण्यासाठी नवरात्रीच्या काळात पॅन्ट्रीमध्ये मांसाहारी पदार्थ तयार केले जाणार नाहीत.  सप्तक्रांती एक्स्प्रेसचे पॅंट्री कार व्यवस्थापक असगर अली सांगतात की, नवरात्रीत तयार होणारे अन्न शुद्ध आणि सात्विक असेल. उपवास करणाऱ्यांना चार प्रकारच्या थाळी दिल्या जातील. २६ सप्टेंबरपासून ही सेवा दिली जाणार आहे.

  थाळीची ही पुढील प्रमाणे उपलब्धल असेल,  आयआरसीटीसीची ही सुविधा ४०० स्थानकांवर उपलब्ध असेल. ही प्लेट ऑर्डर करण्यासाठी प्रवाशाला १३२३ या क्रमांकावर कॉल करून बुकिंग करावे लागेल. मग काही वेळाने, एक स्वच्छ उपवास थाळी तुमच्या सीटवर पोहोचेल.

  थाळीतील मेनू आणि किंमत जाणून घेऊयात. पनीर पराठा, व्रत मसाला, शिंगाडा आणि आलू पराठा – २५० रुपये ;फळ, भोपळ्याचे पकोडे, दही – ९९ रुपये; ४ पराठे, ३ भाज्या, साबुदाण्याची खिचडी – १९९ रुपये; २ पराठे, बटाट्याची भाजी, साबुदाण्याची खीर – ९९ रुपये