हेल्दी केळीचे दहीवडे ट्राय करा, उपवासाला नक्की करून पाहा

   

  साहित्य

  •  कच्ची केळी
  • शिगाड्याचं पीठ
  • राजगिऱ्याचं पीठ
  • दाण्याचं कुट
  •  खाण्याचा सोडा
  • हिरव्या मिरच्या
  • खाण्याचा सोडा
  • साखर
  • जिऱ्याची पूड
  • दही कोथिंबीर आणि मीठ.

   

  कृती

  • केळी सोलून घ्यावी त्यानंतर कुकरमध्ये उकडून घ्यावी.
  • थंड झाल्यावर त्यात जिरंपूड, मीठ आणि मिरचीची पेस्ट घालावी.
  • या मिश्रणाचे गोल चपटे वडे करून घ्यावेत.
  • शिंगाडा आणि राजगिऱ्याचं पीठ पाण्यात घालून पातळ करावं आणि तयार केलेले वडे या पिठात बुडवून काढून तळावेत.
  • तळलेले वडे पाण्यात घालून बाहेर काढून हलक्या हाताने दाबून पाणी काढून टाकावं.
  • दही थोडं घुसळून घेऊन त्यात वाटलेलं आलं, साखर, मीठ, चिरलेली कोथिंबीर घालावी.
  • नंतर तयार केलेले वडे या दह्यात सोडावेत. या दहीवड्यावर लाल किंवा मीठ घ्यावे. आणि दहीवड्यांचा आस्वाद घ्यावा.