नवरात्री आणि गरब्याचा संबंध काय? जाणून घ्या

    नवरात्रीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. २६ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या नवरात्री उत्सवाला सुरवात होणार आहे.  या दरम्यान, व्रतवैकल्ये केली जातात. तसेच, या सगळ्यात जो विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो तो म्हणजे गरबा खेळला जातो.  तरूणाईला गरब्याची आवड असते. चला तर जाणून घेऊयात नवरात्री आणि गरब्याचं विशेष नातं.

    देवीच्या दरबारात गरबा खेळण्याला एक धार्मिक महत्त्व आहे. माते अंबेने महिषासुराचा वध केला असे मानले जाते. महिषासुराच्या अत्याचारापासून मुक्ती मिळाल्यावर लोकांनी नृत्य केले. या नृत्याला लोक ‘गरबा’ म्हणून ओळखले जाते. पारंपारिकपणे मातीच्या भांड्याभोवती दिवा लावून गरबा केला जातो, ज्याला ‘गर्भ दीप’ म्हणतात.

    हे एक प्रतीकात्मक आहे. नर्तक या मातीच्या भांड्यात किंवा घागरीभोवती वर्तुळात फिरतात आणि हात आणि पायांनी गोलाकार हालचाल करतात. आतील प्रकाश हे गर्भातील बाळाचे प्रतीक आहे. हा प्रत्येक स्त्रीचा, विशेषतः मातांचा सन्मान आहे. गर्भ देखील जीवन देणारा आहे, जिथे शरीर जन्म घेते आणि आकार घेते. यासाठी नवरात्रीत गरबा खेळण्याला विशेष महत्त्व आहे.