नवरात्रीत कांदा-लसूण का खाऊ नये? जाणून घ्या

     

    शारदीय नवरात्री २६ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होत आहे. या नऊ दिवसांत मंदिरे, घरे आणि भव्य मंडपात घटाची स्थापना करून देवीची पूजा केली जाईल. नवरात्रीमध्ये लोक दुर्गा देवीची पूजा करतात आणि उपवास ठेवतात.उपवासात सात्विक आहार घेतला जातो ज्यामध्ये धान्य, फळे आणि भाज्या यांचा समावेश होतो. जे व्रत करत नाहीत, तेही केवळ सात्विक भोजन घेतात. नऊ दिवस जेवणात लसूण-कांदा खाणे वर्ज्य देखाल केले जाते.

    देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथन होत असताना त्यातून ९ रत्ने बाहेर आली आणि शेवटी अमृत बाहेर पडले. यानंतर भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले आणि देवतांना अमृत अर्पण केले. तेव्हा राहू-केतू या दोन राक्षसांनी देवांचे रूप धारण केले आणि ते अमृत प्याले.

    यानंतर भगवान विष्णूंनी त्यादोघांना शिक्षा म्हणून सुदर्शन चक्राने त्यांचे दोन भाग केलेत. असे मानले जाते की जेव्हा त्याचे डोके धडापासून वेगळे केले गेले तेव्हा त्याच्या रक्ताचे काही थेंब जमिनीवर पडले आणि त्यातून लसूण कांद्याची उत्पत्ती झाली, असे म्हणले जाते. म्हणूनच कांदे आणि लसूण उग्र वास देतात.राहू-केतूच्या शरीरात अमृताचे काही थेंब पोहोचले होते, त्यामुळे त्यांच्यात रोगांशी लढण्याची क्षमता असते,असेही म्हटले जाते.

    शारदीय नवरात्री ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येते ज्या दरम्यान ऋतू शरद ऋतूपासून हिवाळी हंगामात बदलतो. बदलत्या हवामानामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. अशा स्थितीत या ऋतूत सात्विक अन्न खाल्ल्याने पचनक्रिया बरोबर राहते आणि शरीरातील विषारी पदार्थ शरीरातून बाहेर पडतात. कांदे आणि लसूण हे तामसिक स्वभावाचे मानले जातात आणि ते शरीरातील मानसिक आणि भावनिक ऊर्जा वाढवतात, ज्यामुळे मन भरकटते. त्यामुळे नवरात्रीच्या उपवासाला कांद आणि लसूण खाल्ला जात नाही.