tiger shroff

तब्बल २ आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर टायगर श्रॉफने(tiger shroff) पॉप-कल्चर आऊटफिट, बिग बँग म्यूझिकच्या मदतीने आपले पहिले गाणे ‘अनबिलिवेबल’(unbelievable song) रिलीज(release) केले आहे. टायगरने या गाण्याचा एक म्यूझिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  पुनीत मल्होत्राने या व्हिडिओचे ​​दिग्दर्शन केले आहे.या व्हिडिओच्या माध्यमातून टायगर ऑडिओ- व्हिज्युअलची अनोखी भेटच देत आहे. टायगर श्रॉफने गायलेले हे पहिले गाणे आहे.

टायगरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे गाणे रिलीज केले आहे.या पोस्टमध्ये तो गाण्याच्या व्हिडिओबाबत लिहितोकी, एका बिल्डिंगवरून दुसऱ्या बिल्डिंगवर उडी मारणे हे कठीण आहे, असा विचार करत असतानाच हे गाणेसुद्धा खूप मोठे आव्हान होते. पण तो एक परिपूर्ण अनुभव आहे. जगभरातील संगीतकारांचा मी आदर करतो. मला अजून खूप काही शिकायचे आहे. तोपर्यंत मी केलेला हा एक प्रयत्न #YouAreUnbelievable गाणे प्रदर्शित झाले आहे.

बिग बँग म्यूझिकचे यूट्यूब चॅनल आणि सर्व टेलीव्हिजन प्लॅटफॉर्मवर हा म्यूझिक व्हिडिओ पाहता येऊ शकतो.