नितीनजी गडकरी वाढदिवस विशेष

#HappyBirthdayNitinGadkari वेळप्रसंगी विरोधकांची स्तुती आणि स्वकियांवर प्रहार करण्यासही कचरत नसलेला नेता ; बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी उधळली स्तुतीसुमने
नितीन गडकरी आणि माझ्या परिचयाला २९ वर्षे झाली आहेत. जवळ-जवळ तीन दशकांपासून मी त्यांना आणि त्यांच्या कार्यशैलीला पाहतो आहे. १९९३ मध्ये मी सार्वजनिक बांधकाम खात्याचा राज्यमंत्री झालो. गडकरी त्यावेळी विधान परिषदेत होते. रस्ते, पूल, इमारती, पायाभूत सुविधा या क्षेत्रांबाबत त्यांचा तेव्हापासूनच गाढा अभ्यास होता. या विषयांवर त्यांचे प्रश्न अतिशय अभ्यासपूर्ण व सखोल विवेचन करणारे असायचे. पुढे जाऊन ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बांधकाम मंत्री झाले.