Nitin Gadkari - Jayant Patil is a strong leader who is making Maharashtra famous in the politics of the country

प्रत्येक विषयाचे योग्य ज्ञान असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे महाराष्ट्राचा व देशाच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील रािहले आहेत, हे आजवरच्या त्यांच्या एकूण कारकिर्दीवरून स्पष्ट होते. नितीन गडकरी यांनी आजवर १०० टक्के राजकारण लोकसेवेसाठी केले आहे. याची शेकडो उदाहरणे आहेत. त्यापैकी एक उदाहरण म्हणजे... महाराष्ट्रात एककेळी आघाडी सरकार सत्तेत असताना भाजपविरोधी बाकारवर बसले होते. कुशल बुद्धीमत्तेमुळे त्यावेळी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी नितीन गडकरी यांना देण्यात आली. या काळात सरकारच्या चुकांवर लक्ष ठेवून विधान भवनात पूर्वतयारीनिशी गडकरी यायचे. विरोधी पक्ष नेते म्हणून नितीन गडकरी भाषण करणार म्हणजे हमखास सर­कारवर टीका होणार, हे त्याकाळी सत्ताधाऱ्यांना ज्ञात असायचे. अगदी संयमाने आपले मुद्दे मांडत ते सरकारला चुकांची जाणीव करू देत.

  महाराष्ट्राचे नाव देशाच्या राजकारणात गाजवणारे कणखर नेतृत्व म्हणजे नितीन गडकरी ! महाराष्ट्रात नव्हे तर केंद्राच्याही राजकारणात यशस्वीरीत्या लोकहित जपणारे, लोकनेते नितीन गडकरी यांचा आज जन्म दिवस ! एक उत्तम राजकारणी, विरोधी पक्षनेता कसा असावा, हे वेळोवेळी नितीन गडकरी यांनी दाखवून दिले आहे. नितीन गडकरी यांच्याबाबत लिहायचे झाल्यास एका लेखात शक्य नाही. एवढे उत्तम नेतृत्व त्यांनी आजवर केले आहे.

  प्रत्येक विषयाचे योग्य ज्ञान असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे महाराष्ट्राचा व देशाच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील रािहले आहेत, हे आजवरच्या त्यांच्या एकूण कारकिर्दीवरून स्पष्ट होते. नितीन गडकरी यांनी आजवर १०० टक्के राजकारण लोकसेवेसाठी केले आहे. याची शेकडो उदाहरणे आहेत. त्यापैकी एक उदाहरण म्हणजे… महाराष्ट्रात एककेळी आघाडी सरकार सत्तेत असताना भाजपविरोधी बाकारवर बसले होते. कुशल बुद्धीमत्तेमुळे त्यावेळी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी नितीन गडकरी यांना देण्यात आली. या काळात सरकारच्या चुकांवर लक्ष ठेवून विधान भवनात पूर्वतयारीनिशी गडकरी यायचे. विरोधी पक्ष नेते म्हणून नितीन गडकरी भाषण करणार म्हणजे हमखास
  सर­कारवर टीका होणार, हे त्याकाळी सत्ताधाऱ्यांना ज्ञात असायचे. अगदी संयमाने आपले मुद्दे मांडत ते सरकारला चुकांची जाणीव करू देत.

  राजकारण कायम एकसारखे राहत नाही. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात युतीचे सरकार आले. युती सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी प्राप्त झाल्यानंतर नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले. रस्ते वाहतूक आिण महामार्ग मंत्री असताना नितीन गडकरी यांनी भविष्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेऊन मुंबईत मोठमोठे रस्ते, उड्डाणपूल बांधले. आजच्या गडीला हेच पूल व मुंबईपासून जवळच्या शहरांमध्ये जाण्यासाठी कमी झालेले अंतर हेच त्यांच्या कामाची पोचपावती आहे. या कल्पकतेमुळे आजच्या घडीलाही ते केंद्र सरकारमध्ये रस्ते वाहतूक आिण महामार्ग मंत्री पदावर उत्तमरीत्या कार्यरत आहेत. इतकेच नव्हे तर कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी साखर कारखान्यांमध्ये इथनॉल पॉलिसीची अंमलबजावणी केली होती. सदर पाॅिलसी कायम टिकून राहण्यासाठी नितीन गडकरी यांनी मोलाचे प्रयत्न केले आहेत.

  राजकारणापलीकडे पाहिल्यास राज्यात शरद पवार व नितीन गडकरी हे दोघेही लोकनेते म्हणून प्ारिचीत आहेत. ‘आपण लोकांसाठी आहोत, लोकं आपल्यासाठी नाही!’ लोकसेवक म्हणून लोकांच्या अडचणी जाणून घेणे व त्यावर तोडगा काढणे, हे आपलं परमकर्तव्य समजून हे दोन्ही नेते आजही लोकांना भेटण्यासाठी ठरविक वेळ देतात. त्यावेळेत लोकांच्या समस्या जाणून त्यावर त्वरित तोडगा काढण्यास प्राधान्य देतात.

  आपल्या स्पष्टोक्तेपणामुळे व निर्भयपणे मत मांडत असल्याने वेळोवेळी सरकारलाही आपल्या चुका दाखवून त्या सुधारण्यास भाग पाडले आहे. नितीन गडकरी यांचा हाच स्वभाव गुण भाजपमधील अनेकांना खटकतो. मात्र, त्या नेतेमंडळींना पर्याय नसल्याने गप्प राहणे भाग पडते. हा दिलखुलासपणा, खंबीर नेतृत्व क्षमता कायम टिकवून राहावी आणि महाराष्ट्रासह देशाच्या विकासासाठी नितीन गडकरी यांचे योगदान वेळोवेळी मिळत राहण्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य लाभो, हीच सदिच्छा त्यांच्या जन्मदिनी व्यक्त करतो.

  जयंत पाटील, मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस