रणजितसिंग डिसले गुरुजींना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या, शिवसेना आमदारांच्या मुलीची मागणी

रणजितसिंग डिसले गुरुजींना पुरस्कार देणं हा राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान असेल, असं मत चौगुले यांनी व्यक्त केलंय. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून डिसले गुरुजींचा सन्मान करण्याची विनंती करण्यात आलीय.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार पटकावणारे रणजितसिंह डिसले गुरुजी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे, अशी मागणी शिवसेना आमदारांच्या मुलीने केलीय. शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कन्या आकांक्षा चौगुले यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केलीय.

रणजितसिंग डिसले गुरुजींना पुरस्कार देणं हा राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान असेल, असं मत चौगुले यांनी व्यक्त केलंय. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून डिसले गुरुजींचा सन्मान करण्याची विनंती करण्यात आलीय.

या पत्रात आकांक्षा चौगुले म्हणतात, “रणजिंतसिंग डिसले गुरुजी यांना युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्तरावरील उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते भारतातील पहिले शिक्षक ठरले आहेत. भारतातील सर्व क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन केले गेले. परंतु, त्यापलीकडे जाऊन अशा व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं.

महाराष्ट्र ही समाजसुधारकांची भूमी आहे. या मातीने मातीचा सन्मान करणाऱ्यांच्या अनेक पिढ्या जन्माला घातल्या आहेत. डिसले गुरुजींना पुरस्कार देऊन आपण फक्त एका व्यक्तीचा सन्मान करणार नसून  प्रत्येक खेड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा सन्मान करणाऱ आहोत. हे शिक्षक मिळेल त्या साधनाने शाळेत जातात. सध्या दारोदारी जाऊन शिक्षण देत आहेत. महाराष्ट्र भूषण हा राज्यातील सन्मानाची सर्वोच्च सर्वोच्च खूण आहे. त्यामुळं नुसता गौरव करत आणि शुभेच्छा देऊन एका युवकाचं कौतुक होऊ शकतं, एका शिक्षकाचं नाही,” असं या पत्रात म्हणण्यात आलंय.