कोरोनाची लस किती प्रभावी? जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना लस घेतली, दोन आठवडे उलटले आणि झाला कोरोना !

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दोन आठवड्यांपूर्वीच कोरोनाची लस घेतली. मात्र त्यानंतर जेव्हा त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली, तेव्हा त्यांनी चाचणी केली. या चाचणीला निकाल पॉझिटीव्ह आला असून लस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी कोरोनाची त्यांना लागण झाली असल्याचं दिसून आलंय. या महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांनी कोव्हॅक्सिन लसीचा डोस घेतला होता. त्यामुळे कोरोनाची लस घेतली तरी त्याची परिणामकारकता किती, हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय. 

    देशात कोरोनाचं लसीकरण विक्रमी वेगानं सुरू आहे. लस आली म्हणून अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. कोरोना झाला तरी आता लस आहे, हा दिलासा असल्यामुळे अनेकांनी कोरोनाबाबतचे नियम पाळणं बंद केल्याचं चित्र दिसतंय. मात्र ज्या लसीच्या भरवशावर आपण आहोत, त्याच्या परिणामकारकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं चित्र आहे.

    उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दोन आठवड्यांपूर्वीच कोरोनाची लस घेतली. मात्र त्यानंतर जेव्हा त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली, तेव्हा त्यांनी चाचणी केली. या चाचणीला निकाल पॉझिटीव्ह आला असून लस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी कोरोनाची त्यांना लागण झाली असल्याचं दिसून आलंय. या महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांनी कोव्हॅक्सिन लसीचा डोस घेतला होता. त्यामुळे कोरोनाची लस घेतली तरी त्याची परिणामकारकता किती, हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय.

    लस घेतली म्हणजे कोरोना होणारच नाही, याची खात्री नसल्याचे यापूर्वीही अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. यामुळे कोरोनाविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. त्यामुळे कोरोनाची लस घेतली तरी कोरोनासाठी घालून दिलेले सर्व निकष पाळणं आणि खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं जातं.

    कोरोना लस घेतल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढत असली, तरी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन यासारखी खबरदारी घेतली नाही, तर कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. लस घेतलेल्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती वाढत असली तरी त्या कोरोनाच्या विषाणूच्या कॅरिअर बनू शकतात, हे यापूर्वीदेखील निदर्शनाला आलेत. त्यामुळे लशीच्या भरवशावर काळजी घेणे बंद केले, तर ही चूक महागात पडू शकते, हेच यातून दिसून आलंय.