ट्रेंडिंग टॉपिक्स
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेटJanuary, 01 1970

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर, उस्मानाबाद दौऱ्याचीही तारीख ठरली, जाणून घ्या

ऑटो अपडेट
द्वारा- Swapnil Jadhav
प्रतिनिधी नवराष्ट्र.कॉम
12:42 PMOct 19, 2020

पुढचे दोन दिवस पावसाचा इशारा, सगळ्यांनी सावध राहा, सरकार तुमच्यासोबत आहे : मुख्यमंत्री

सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन दिवसात पावसाचा इशारा आहे. नुकसानभरपाई तर देऊच, मात्र सगळ्यांनी सावध राहा. मी दिलासा देण्यासाठी आलोय. काळजी घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत : मुख्यमंत्र्यांचा गावकऱ्यांशी संवाद

12:22 PMOct 19, 2020

केंद्राने राज्याचं देणं बाकी आहे ते द्यावं, ..तर हात पसरावे लागणार नाहीत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरुन टीका केली होती. त्यांनी म्हटले होते की, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आधी राज्य सरकारने मदत करावी. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्याची थकीत येणी जर केंद्राकडून वेळेत आली तर मदतीसाठी हात पसरावे लागणार नाहीत केंद्राने विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये दुजाभाव करु नये. असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच आम्ही शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यास प्रयत्नशील असून शेतकऱ्यांनी नाराज होऊन नये तसेच त्यांनी आपल्या जीवाचे बरे वाईटही करु नये असे आवाहन केले आहे. 

12:14 PMOct 19, 2020

नुकसान भरपाई देऊ पण कोणाचाही जीव जाऊ देऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे : मुख्यमंत्री

मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे, तुम्ही एकटे नाही, कोणीही वाऱ्यावर पडलं नाही, आपलं सरकार हे तुमचं सरकार आहे, तुमच्या पाठिशी आहे, तुम्हाला धीर द्यायला आलो आहे, काळजी करू नका, नुकसान भरपाई देऊ पण कोणाचेही जीव जाऊ देऊ नका. सावध राहा, किती नुकसान झालंय याचे पंचनामे सुरु आहे, माहिती गोळा केली जात आहे पण माहिती गोळा करून त्याचा अभ्यास करत बसणार नाही, हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, लवकरच मदत जाहीर करू असे अश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केले आहे.

 

11:19 AMOct 19, 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत

राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान (Huge loss Of Farmers) झाले आहे. सर्वच राजकीय नेते (Leader) राज्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यास घराबाहेर पडले आहेत. राज्याचे मुख्यमंत्रीही (Chief Minister Uddhav Thackeray) विरोधकांच्या भरघोस टीकेनंतर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यास प्रत्यक्ष रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत.

उस्मानाबाद : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान (Huge loss Of Farmers) झाले आहे. सर्वच राजकीय नेते (Leader) राज्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यास घराबाहेर पडले आहेत. राज्याचे मुख्यमंत्रीही (Chief Minister Uddhav Thackeray) विरोधकांच्या भरघोस टीकेनंतर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यास प्रत्यक्ष रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत.

परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशः हाहाःकार माजवला आहे. शेतकरी संकटात असतानाही अद्याप कोणतीही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारने केलेली नाही. नेतेमंडळी थेट बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यावर कोणती मदतीची घोषणा करतात का यावरही शेतकऱ्यांचे लंक्ष केंद्रित आहे.

लवकरच मुख्यमंत्री करणार उस्मानाबाद जिल्ह्याती नुकसानग्रस्त भागाची पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता सोलापूर विमानतळावर येतील. त्यानंतर सकाळी १०.१५ वाजता उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटगाव व अपसिंगा येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व शेती पिकांच्या नुकसानीची ते पाहणी करतील आणि त्यानंतर तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पूरपरिस्थितीबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर दुपारी १.४५ वाजता मुंबईकडे जाण्यासाठी ते सोलापूरच्या दिशेने रवाना होतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी २० ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्हा पाहणी दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा दिवसभर होती. मात्र हा दौरा बुधवारी २१ ऑक्टोबर रोजी आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
२५ बुधवार
बुधवार, नोव्हेंबर २५, २०२०

'Fake TRP' प्रकरणी पोलिसांनी वृत्तवाहिन्यांवर केलेली कारवाई योग्य आहे, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement