navaratri festival

मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थानच्या बैठकीत हा निर्णय घेतला. यामुळे पुजारी वर्गासोबतच तुळजापूर शहरातील व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या ६ महिन्यांपासून तुळजाभवानी मंदिर बंद असल्याने अर्थिक अडचणीत सापडलेल्या शहरवासियांना मंदिर उघडण्याचे वेध लागले होते.

तुळजापूर : कोरोनाच्या संसर्गामुळे (Corona)  अनेक सणवार साध्या पद्धतीने करण्यात आले. गणेशोत्सवावरही कोरोनाचं सावट होतं, त्यामुळे अनेक ठिकाणचा गणेेशोत्सवही साध्यापद्धतीने साजरा (celebrated) करण्यात आला. आता नवरात्रौत्सवावरही कोरोनाचं सावट असून नवरात्रौत्सवही (Navratri festival)  सीमित करण्यात आलाय. त्यातच तुळजापूरातील नवरात्र महोत्सव रद्द करण्यात आला असल्याची माहिती मंदिर संस्थानने दिली.

मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थानच्या बैठकीत हा निर्णय घेतला. यामुळे पुजारी वर्गासोबतच तुळजापूर शहरातील व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या ६ महिन्यांपासून तुळजाभवानी मंदिर बंद असल्याने अर्थिक अडचणीत सापडलेल्या शहरवासियांना मंदिर उघडण्याचे वेध लागले होते. जागतिक महामारी कोरोनाचा फटका तुळजाभवानी मातेच्या वर्षातील सर्वात मोठा उत्सव शारदीय नवरात्र महोत्सवाला बसला आहे. गर्दी टाळण्यासाठी नवरात्र महोत्सव कालावधीत भाविकांना शहराबाहेरच अडविण्यात येणार आहे.

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त सर्व धार्मिक विधी दरवर्षीप्रमाणेच होतील परंतु ते अंतर्गतच असतील. शासननिर्णय झाला तरच मंदिरात प्रवेश व दर्शन सुरू केले जाणार आहे, अन्यथा नाही, असे असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने स्पष्ट केले.

कोरोना साथीमुळे यंदाच्या वर्षी नवरात्रौत्सवात गुजरातमध्ये गरब्याच्या आयोजनास संमती न देण्याचा निर्णय मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या सरकारने घेतला. या संसर्गाचा आणखी फैलाव होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात येत असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. पण यंदा गुजरातमध्ये गरबा खेळला जाणार नसल्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे. १७ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रौत्सव आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अहमदाबाद येथे राज्यस्तरीय गरबा महोत्सव सुरू केला होता. यंदा तो ही होऊ शकणार नाही.