उस्मानाबादमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला

  • रविवारी सकाळी कोरोनाचे १७ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच शनिवारी कोरोना रुग्णांची संख्या १९ होती. जिल्हयात कोरोना बाधितांचा एकूण आकडा ३७१ आहे. तर कोरोनामुळे १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आताच्या घडीला ८८०५ लोकांना होम क्वारंटाईन केले आहे. त्यातील ७२० लोकांचा कालावधी संपला आहे.

उस्मानाबाद – जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग तेजीने वाढताना दिसत आहे. जिल्ह्यातील सर्व उपाययोजनांचा चक्काचूर झाल्याच स्पष्ट होत आहे. सुरुवातील उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना शिरकाव झाला नव्हता परंतु शहरातु आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचा शिरकाव झाला आणि कोरोना विषाणूने रौद्ररुप धारण केले आहे. 

रविवारी सकाळी कोरोनाचे १७ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच शनिवारी कोरोना रुग्णांची संख्या १९ होती. जिल्हयात कोरोना बाधितांचा एकूण आकडा ३७१ आहे. तर कोरोनामुळे १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आताच्या घडीला ८८०५ लोकांना होम क्वारंटाईन केले आहे. त्यातील ७२० लोकांचा कालावधी संपला आहे. 

कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असल्यामुळे जिल्ह्यात संचारबंदी केली आहे. विविध उपाययोजना राबवत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर सर्व उपाययोजनाचा वापर करुन शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.