कोरोनाबाधित रुग्णाचा ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे मृत्यू

  • रुग्णालयाच्या गलथान कारभरामुळे रुग्णाला त्रास होत होता. रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. परंतु रुग्णाने उपचारा दरम्यान सांगितले होते की ऑक्सिजनची गरज असली तरी ऑक्सीजन काढले जाते. तसेच रात्रीचे कोणीही नसते. रात्री त्रास झाल्यास डॉक्टर उपस्थित नसतात.

उस्मानबाद – उस्मानाबादमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. तेथील अपुऱ्या वैद्यकीय सेवेमुळे अनेक रुग्ण दगावले आहेत. अशीच एक घटना उघडकीस आली आहे. रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्या व्यक्तीला श्वसनाचा त्रास होत होता म्हणून त्याला ऑक्सीजन लावला होता. परंतु रुग्णालयाच्या गलथान कारभरामुळे रुग्णाला त्रास होत होता. रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. परंतु रुग्णाने उपचारा दरम्यान सांगितले होते की ऑक्सिजनची गरज असली तरी ऑक्सीजन काढले जाते. तसेच रात्रीचे कोणीही नसते. रात्री त्रास झाल्यास डॉक्टर उपस्थित नसतात. 

मृत्यूपूर्वी व्हिडिओ करुन संपूर्ण परिस्थिती त्यांनी सांगितली होती. त्यांच्या पत्नीमुळे त्यांना कोरोनाची लागण झाली त्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.