एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले…

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पक्षांतरांबाबत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. आता तर २२ ऑक्टोबर रोजी खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असे बोलले जात आहे. पण, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अशी शक्यता नाकारली आहे.

उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पक्षांतरांबाबत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. आता तर २२ ऑक्टोबर रोजी खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असे बोलले जात आहे. पण, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अशी शक्यता नाकारली आहे. यावेळी पत्रकारांनी एकनाथ खडसे हे २२ ऑक्टोबरला राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार आहे का?, असे विचारले असता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

असे मुहूर्त रोज सांगितले जात असतात. मी त्यावर बोलणार नाही, असं म्हणत एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांनी बोलण्याचे टाळले. एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे. राजकारण कसे आहे, हे त्यांना चांगले माहिती आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे, असं याआधीही फडणवीस म्हणाले होते.

दुसरीकडे आता एकनाथ खडसे हे पुढील दोन दिवसांमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये नेमकं काय घडते हे पाहण्याचे ठरणार आहे.